सेवानिवृत्त कर्मचारी हाजी अजीज खान यांचे दुखद निधन…
पुसद :- राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यक चे जिल्हाध्यक्ष खान मोहम्मद खान सनी यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथील सेवानिवृत्त कर्मचारी हाजी अजीज खान यांचे वयाच्या 82 व्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले आहे…
त्यांच्या मागे खान मोहम्मद खान सनी , डॉ नूर खान , मोमीन खान इंजीनियर , ऍड. जावेद खान , वाजीद खान हे त्यांचे मुले आहेत त्यांचे पश्चात मुले मूली , नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे…
पुसद च्या गढ़ी वार्ड , पुस नदी जवळ मुस्लिम कब्रस्तान मध्ये रात्री 9 वाजता त्यांची दफनविधी पार पडली
शहरातील प्रतिष्ठित नागरिक , राजकीय व सामजिक क्षेत्रातील नेते मंडळी पत्रकार मंडळी व समाजबांधवांनी सांत्वनपर भेटी देऊन शोक व्यक्त केला…







