राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषणला एम.आय.एम पक्षा चा जाहीर पाठींबा..
पुसद :-
महाराष्ट्र राज्यात एस.टी. कर्मचारी चे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न कितेक वर्षांपासून प्रलंबित आहेत सरकार बदलले तरीही समस्या कायमच आहे.एस. टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. पुसद येथील बसस्थानका मध्ये एस.टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. एम.एस.आर.टी.सी याला शासकीय खात्या मध्ये समावेश करण्यात यावे आणि सर्व कर्मचारी यांना शासकीय वेतन लागू करण्यात यावे.
तसेच सर्व शासकीय सवलत देण्यात यावे.यासाठी एम.आय.एम पक्षा नी समर्थन पत्र देऊन जाहीर पाठींबा देण्यात आला. ह्या सर्व बाबी एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या बद्दल जर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर बेमुदत उपोषणाचे आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र करण्यात येणार असल्याचे पुसद येथील कर्मचाऱ्यांनी उपोषण मंडपात सांगितले.
या वेळी अमजद खान शहराध्यक्ष, सैय्यद इम्तियाज निरीक्षक , डॉ.मोहम्मद जुबेर तालुका कार्याध्यक्ष , मिर्झा आदिल बेग प्रवक्ता , फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष , मोहसीन खान युवक शहराध्यक्ष ,शेख अजीज शहर सचिव,सुल्तान खान शहर सचिव ,अब्दुल रहेमान चव्हाण मिडिया इन्चार्ज , समीर खान मजलिस पदाधिकारी व अन्य कर्मचारी उपोषण मंडपात उपस्थित होते….







