जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन
पुणे
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथील योगेशनाना फडतरे यांची पुणे जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे.यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपगाव येथे आज भव्य नागरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते फडतरे यांना निवडीचे पञ देवून सत्कार करण्यात आला.
भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजितदादा शिवतारे उपस्थित राहणार आहे ,कार्यक्रमासाठी पुरंदर -हवेली चे आमदार संजय जगताप, मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके , पुणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक गणेश आबा ढोरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथील योगेश फडतरे यांचा यापुर्वी जिल्हा परिषदेचे वतीने आदर्श सरपंच म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे .पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष पदाची जबाबदारी फडतरे यांनी सांभाळली आहे.
त्यांची जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबददल भव्य नागरी सत्कार समारंभासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे ,माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी आधिकारी संभाजी झेंडे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते , राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, दिवे -गराडे जिल्हा परिषद गणाचे काॅग्रेंस अध्यक्ष संदिप फडतरे , बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद सदस्य दत्ताञय झुरंगे , सुदाम आप्पा इंगळे ,कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप अण्णा पोमण,सुनिता काकी कोलते , पंचक्रोशीतील विविध पक्षाचे पदाधिकारी आजी -माजी सरपंच, उपसरपंच यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.







