बीड मध्येअखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ च्या वतीने श्री गुरु गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा
बीड ;
. अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ तालुका बीड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिल्हाध्यक्ष माननीय श्री चव्हाण सर व सौ संगीता चव्हाण यांच्या हस्ते अंकुश नगर येथील कपिल मुनी मंदिर व गोरक्षनाथ यांचा अभिषेक करण्यात आला. नंतर महाराष्ट्रात गाजलेली विनोदाचार्य ह .भ .प. भरत महाराज जोगी परळी व मा.डॉक्टर विक्रम सारुख शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) तसेच मा.प्रशांत पंवळ यांची प्रवचने झाली .या कार्यक्रमासाठी मा . डॉ. योगेश क्षीरसागर हे अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प भरत महाराज जोगी मा.डॉ. विक्रम सारूख शिक्षणाधिकारी साहेब (माघ्य) जि.प. बीड हे लाभले.
प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. योगेश क्षीरसागर माननीय डॉ. विक्रम सारुख साहेब मा.गौतमजी राठोड मा. भिमराव वाघचौरे सभापती मा. किशोर पिंगळे सभापती डॉ.गिरी साहेब मा.रामशेठ वाघ मा.भैय्या सा़हेब मोरे नगरसेवक मा.रणजित बनसोडे डॉ.रमेश शिंदे मु अ. डॉ कैलास पैठणकर आणि. ह भ प भरत महाराज जोगी मा.भारत चव्हाण (मा.गटविकास अधिकारी)प्रा.बालकनाथ यादव सर मा.संजय सावंत ( मु.अ.) डॉ.सुरवसे यांच्या हस्ते गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित निमंत्रित केलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पहार घालून शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय डॉ. के.बी. पैठणकर यांनी केले तसेच त्यांनी गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनाचे महत्त्व समाज बांधवांना सांगितले तसेच या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे मान्यवर यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले व गुरु गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त नाथ बांधवांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
तसेच अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी समाज बांधवांना गोरक्षनाथ प्रगट दिन निमित्त शुभेच्छा दिल्या व गुरु गोरक्षनाथ यांचे मुळ ठिकाण उत्तर प्रदेश मधील गोरखपुर असून तेथील मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख केला व गुरु गोरक्षनाथ यांच्या चरित्राचे कथन केले. तसेच नाथ बांधवांना वेळोवेळी कोणताही कार्यक्रम असल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणल्यामुळे सर्वांचे आभार मानले .
या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे कार्यकर्ते सहपरिवार उपस्थित होते श्री.परमेश्वर पवार श्री नवनाथ जाधव श्री किसन मधुरकर श्री.हरिदास बामणे श्री रंगनाथ पैठणकर श्री दत्ता शिराळकर सर श्री उत्तम पांचाळ श्री बाळनाथ कराळे श्री गणेश शिंदे श्रीअनिरुद्ध चव्हाण श्री भैरवनाथ शिंदे सर श्री राजकुमार शेळके श्री नरसिंग नागरगोजे श्री पंढरीनाथ निकम श्री धर्मराज जाधव श्रीमती जयश्रीताई चव्हाण श्री. गोकुळ शिंदे श्री रविकिरण चव्हाण श्री बाबासाहेब पवार श्री बबन वाघमारे आणि इतर नाथ बांधव व महिलावर्ग उपस्थित होता
या कार्यक्रमासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका मा.हरिभाऊ भराडी श्री रंगनाथ पैठणकर युवा नेतृत्वअक्षय बामणे यांनी बजावली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष केसी चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय सावंत सर यांनी केले नंतर बीड तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद घेतल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली.







