सहकारी संस्थेचा कायदा*
सदर क्रमांक:-001
ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय: आम्ही एका मोठ्या सोसायटीमध्ये राहतो. फ्लॅट घेताना बिल्डरने एक वेळ देखभाल खर्चासाठी रु. ५०,००० घेतले व त्यानंतर बिल्डरने सोसायटी स्थापन करून एक वेळ देखभाल खर्चाचा हिशेब देताना काही रक्कम कापून घेतली. त्यावर आम्ही नाईलाजाने ही रक्कम स्वीकारली; परंतु सर्व हिशेब चुकीचे देऊन बिल्डरकडे काही लाखांच्यावर रक्कम बाकी आहे. बिल्डरने स्वतःसाठी काही सदनिका ठेवल्या. त्याचा एक वेळ देखभाल खर्च दिला नाही. बिगरशेती करसुद्धा भरला नाही. बिल्डरने आम्हाला ताबा दिल्यानंतर दुसरा प्रकल्प हाती घेतला व तो पूर्णत्वाच्या मार्गावर आहे; परंतु बिल्डर सोसायटीच्या नावे खरेदीखत करून देत नाही. बिल्डरकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, यावर काय उपाय आहे.
उत्तर: आपण बिल्डरकडून सदनिका खरेदी करून घेताना महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्टप्रमाणे करारनामा नोंदवला असेल. सदरील कायद्याप्रमाणे बिल्डरने इमारतीच्या देखभालीबाबत काटेकोरपणे हिशेब ठेवणे बंधनकारक आहे, तसेच जोपर्यंत मालकी तबदील होत नाही तोपर्यंत सर्व कर व सहकारी देणी बिल्डरने देणे बंधनकारक आहे. कायद्याप्रमाणे बिल्डरने सोसायटीच्या नावे खरेदीखत करून देणे आवश्यक आहे. या सर्व बाबतीत महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टप्रमाणे ॲक्टमध्ये अत्यंत काटेकोर तरतुदी आहेत. सदर तरतुदींचे पालन होत नसल्यास आपण बिल्डर विरुद्ध दिवाणी न्यायालयात योग्य त्या कारणांसाठी दावा दाखल करून दाद मागू शकता. तरतुदींचे पालन न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद सुद्धा कायद्यामध्ये आहे. त्याबद्दलचा खटला फौजदारी न्यायालयात दाखल होऊ शकतो.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे सो.
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत,
सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
“सुरक्षित माझे घर” हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे त्याची पुढे लिंक देत आहे. https://www.amazon.in/dp/9384316024/ref=cm_sw_r_awdo_navT_g_AHS83DH8ZVTGAWJVX37C