जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांचे ८ डिसेंबर रोजी तासगाव येथे व्याख्यान .
गोमेवाडी ( आटपाडी ) येथील जेष्ठ साहित्यिक, कवी व प्रसिद्ध व्याख्याते सुनील दबडे यांचे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज राममंदिर तासगाव येथे ८ डिसेंबर रोजी दुपारी १.०० वाजता ” सेवानिवृत्तीनंतरचं जगणं ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
तासगाव तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक सेवक सेवानिवृत्त मंडळातर्फे हे व्याख्यान होणार असून या व्याख्यानासाठी तासगाव तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित राहणार आहेत .
सुनील दबडे यांची चार पुस्तके प्रसिद्ध असून या पुस्तकांना राज्य स्तरावरचे प्रतिष्ठेचे सहा साहित्य पुरस्कार मिळाले आहेत . ग्रामीण व बालकुमार साहित्य संमेलनांचे त्यांनी यशस्वी संयोजन केले आहे . अनेक बालकुमार साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषविली आहेत .
शासनाच्या ग्रंथ महोत्सवात परिसंवाद व काव्य वाचन कार्यक्रमासाठी यापूर्वी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते . अखिल भारतीय साहित्य संमेलनातील बोली भाषा काव्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून यापूर्वी त्यांची निवड झाली होती . अनेक जिल्ह्यांत विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत .
आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांचे विविध विषयांवर अनेक कार्यक्रम झाले आहेत . माणदेशी एफएम रेडिओवर त्यांनी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम केले आहे . यापूर्वी शाळा कॉलेज व विविध मंडळातर्फे विविध विषयांवर व्याख्यानाचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत .







