• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी.

माणगंगा by माणगंगा
December 6, 2021
in महाराष्ट्र
0
पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी.

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी.

हल्ल्यासंदर्भात पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सोपविले निवेदन.

पुसद / प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुसद येथील दोन पत्रकार बंधूंवर वार्तांकन करीत असताना जमावाने भ्याड हल्ला चढविला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या जवळील साहित्य बळजबरीने लुटले. या घटनेचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आले.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो प्रत्येक घटनेचे वार्तांकन निर्भीड व निष्पक्षपणे तो समाज व शासन तसेच प्रशासनासमोर मांडत असतो अशातच अतिसंवेदनशील भागात जाऊन सुद्धा जीव मुठीत घेऊन पत्रकारिता करतो मात्र सद्या पत्रकार असुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली. मागील घटने प्रमाणे पुन्हा शुक्रवारी काळी दौलत खान येथे झालेल्या पत्रकारांवरील भ्याड हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पुसद येथील जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कान्हु आणि मुकाबला न्यूज-24 चे प्रतिनिधी अँकर सैय्यद फैजान यांच्यावर काळी दौलत खान येथे हल्लेखोरांनी शुक्रवार दिनांक 03 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे आठ वाजता च्या सुमारास 30 ते 40 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढविला तसेच पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हल्लेखोरांनी पत्रकारांजवळील संपूर्ण साहित्य रोख रकमेसह अंदाजे 80 हजार पर्यंतच्या मुद्देमाल बळजबरीने लुटले.

सदर घटना ही जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री दिलीप भुजबळ पाटील, मा उपविभागीय अधिकारी श्री सावन कुमार, तसेच पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांच्या सह पुसद येथील आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या समोर घडली हे विशेष. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनासमोर जर चौथ्या आधार स्तंभावर हल्ला झाला आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे. अशा घटना वारंवार घडू नये. या घटनेतील हल्लेखोरांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद तालुक्यातील समस्त प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाच्या पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच इतर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सदर निवेदनावर जेष्ठ पत्रकार ललित सेता, दीपक हरीमकर, हरिप्रसाद विश्वकर्मा, यू.एन. वानखेडे, ॲड. अनिल ठाकूर, मारोती भस्मे, दीपक महाडिक, सैय्यद मुजीबोद्दिन, प्रदीप नरवाडे, अमोल व्हडगिरे, रुपेंद्र अग्रवाल, बळवंत मनवर, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे, गणेश राठोड, संजय कुमार हनवते, राजेश ढोले, रामदास कांबळे, रवि मोगरे, बाबूलाल राठोड, प्रकाश खंडागळे, मनीष दशरथकर, दिनेश खांडेकर,राजू सोनूने, अनिल चव्हाण, अहमद पठाण, शेख शब्बीर, हाफिझ रब्बानी, मुबाशिर शेख, बाबा खान, पवन चव्हाण, उमेश जाजू, विजय निखाते, अमोल ठाकूर, शेख अक्रम, वर्षा कांबळे, मजीद खान, सुहास पवार, प्रकाश खिल्लारे, समाधान केवठे, सैय्यद फैज़ानोद्दिन, संदेश कान्हु, संतोष मस्के, संजय रेक्कावर आदी पत्रकारांचे सह्या आहेत.

Views: 210
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न…!

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)