आदर्श माता मॉ साहेब जिजाऊ
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव गिरजाबाई उर्फ म्हाळसाबाई होते 1605 मध्ये जिजाऊंचा शहाजी राज्याशी विवाह झाला. पुढे शहाजीराजे व जिजाऊंच्या पोटी शुर प्रतापी संभाजी राजे व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजे या दोन नररत्नांनी जन्म घेतला.
थोरले संभाजी राजे शहाजी राजांजवळ वाढले तर शिवाजी राजांची सर्व जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली काही कारणामुळे जेेेेव्हा भोसले व माहेरच्या जाधव घराण्यात वमनस्थ निर्माण झाले तेव्हा त्यांनी प्रतिनिष्ठेला आधिक महत्व दिले.
जिजाऊ ह्या केवळ शहाजीराजांच्या वीरपत्नी नव्हत्या तर जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा आदर्श माता होत्या. हिंदवी स्वराज्याची स्वप्न शिवाजी राजा मध्ये पाहणारा त्या महाण राष्ट्र माता होत्या त्यांनी स्त्री ही क्षणकालाची पत्नी व अनंत काळाची माता हे प्रत्यक्षात खरे करून दाखवले
जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी व रयतेसाठी घडवले त्यांनी शिवबाला लहान वयात रामायण-महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या दादोजी कोंडदेवांच्या सहकार्याने शिवरायांना राजकारण व शास्त्रविद्येत कुशल बनवले शिवरायावर उत्तम संस्कार केले सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे धडे दिले त्यामुळे स्वराज्यात कधीही कोणत्याही माणसावर अन्याय झाला नाही जिजाऊंनी आयुष्यभर शिवरायांना प्रेरणा दिली त्यांनी पुण्याचा विकास राज्यकारभार चोख हाताळणे गोरगरीब प्रजेला न्याय मिळवून देणे शेतकऱ्याना मदत करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या
मध्ययुगीन कालखंडात सर्वत्र जुलूमशाही राजवटी महाराष्ट्रात अधिकार रूड होत्या जुलूम अत्याचारा
नी रयत त्रासली होती अशा प्रतिकूल तो काळ 1630 ते 1642 या तपाच्या कालखंडात
जिजाऊंचे जीवन अत्यंत संघर्ष व धावपळीत गेले खरे पाहता एखादी स्त्री हताश होऊन बसली असती मात्र या खंबीर व प्रेरणादायी व्यक्ती महत्त्व असलेल्या मातेने बाल शिवाजी ला सोबत घेऊन स्वराज्य निर्मितीचे स्वप्न फुलवली अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक सामाजिक व राजकीय वातावरणात मराठी जनतेचा बहुजनांचा उद्धारासाठी
हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
लिखान
ललिता महेंद्र खोंडे
मो.7875727669