तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या रब्बी ज्वारीचे बियाणे बोगस
तक्रार करूनही दखल घेतली नाही
तऱ्हाडी:- येथील शेतकरी भाऊसाहेब चव्हाण राहणार तऱ्हाडी तालुका शिरपूर यांनी आशिष कृषी सेवा केंद्र शिरपूर येथून रब्बी ज्वारी हायटेक 3201 या जातीचे बियाणे घेतले होते त्यावेळी शिवारातील गट नंबर ९८/ १ या क्षेत्रातील १ हेक्टर १६आर क्षेत्रावर पेरणी दिनांक 10 डिसेंबर २०२१ रोजी पेरणी केली असता त्या ज्वारीचे पीक दिनांक १० मार्च पर्यंत तीन महिने झाले तरी कंणसाला दाणे आले नाहीत
सदर कृषी सेवा केंद्र मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना शेतात पाठवून पाहणी करण्यासाठी पाठविले त्या नंतर कंपनी च्या प्रतिनिधी ने आपण तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांच्याकडे तक्रार दाखल करावी अशी सूचना केली असता त्याकरिता मी दिनांक 7 मार्च रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केला असून प्रत्यक्ष भेट घेऊन नहीं आज पर्यंत कृषी तालुका कृषी अधिकारी यांनी म माझ्या अर्जाची दखल घेतली नाही तरी याबाबत त्वरित पंचनामा करून मला न्याय मिळावा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे







