तऱ्हाडी ते वाघाडी दरम्यान रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडप्याचे साम्राज्य. वाहन चालवताना करावी लागते कसरत
तऱ्हाडी:- बऱ्हाणपूर ते अंक्लेश्वर या राज्य महामार्ग आहे या महामार्गावर गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांतील प्रवासी वाहतूक व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते तरी तऱ्हाडी ते वाघाडी दरम्यान रस्त्याच्या कडेला दोनी बाजुला ठिक ठिकाणी काटेरी झुडप्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर झाले आहे यामुळे वाहन ओव्हर टेक करताना समोरचं वाहन चालकास दिसत नाही
यामुळे वाहन अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत व मोटरसायकल धारकांना बऱ्याच वेळा काटेरी झुडप्याचे काटे ओरखळले जातात महिन्यांपूर्वी यांच्या दरम्यान एक मोटरसायकल धारकांना अपघात होऊन मृत्यू झाला व परवा मोठा अपघात झाला तरी या तऱ्हाडी ते वाघाडी दरम्यान वाहन चालकास मोठी कसरत करावी लागते तरी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर यांनी त्वरित सर्व्हे करून तऱ्हाडी ते वाघाडी दरम्यान रस्त्याच्या कडेला दोनी बाजुला असलेल्या काटेरी झुडप्याचे साम्राज्य काढण्यात यावे अशी मागणी वाहन चालक व मोटरसायकल धारकांनी मागणी केली आहे