• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

इंधन दरकपात ही मोदी सरकारची धूळफेक – प्रा डॉ मनिषा कायंदे

माणगंगा by माणगंगा
May 23, 2022
in मुंबई
0
इंधन दरकपात ही मोदी सरकारची धूळफेक – प्रा डॉ मनिषा कायंदे

इंधन दरकपात ही मोदी सरकारची धूळफेक – प्रा डॉ मनिषा कायंदे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र.

मुंबई, दि २२ मे: मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी करात कपात केल्याने राज्याने VAT कमी करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष करत आहेत. मुळातच आधी वाढवलेला अबकारी कर काही प्रमाणात कमी करून मोदी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषद सदस्या प्रा डॉ मनिषा कायंदे यांनी केली आहे.

केंद्राने अबकारी कर कमी करण्याआधी पेट्रोलची मुंबईतील किंमत १२०.४६ पैसे होती. मोदी सरकारने यात ८ रुपये कमी केल्याने पेट्रोल चे दर ९.१६ पैसेने तर डिझेलच्या केंद्रीय करात ६ रुपये कपात केल्याने डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी झाले आहे.

यातील धूळफेक दाखवून देताना प्रा कायंदे यांनी आकडेवारीच सादर केली आहे. प्रा डॉ कायंदे म्हणाल्या, पांच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता त्यात अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये कमी केले असेल तरी वाहन धारकांना दिलासा मिळालेला नाही.

त्या म्हणाल्या, मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी पेट्रोलवर रूपये ९.४८ तर डिझेलवर रुपये ३.५६ अबकारी कर आकारला जात होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पेट्रोलवरील अबकारी कर २७.९० रुपये केला तर डिझेलवर २१.८० रुपये केला. मोदी सरकारने घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयानंतर पेट्रोलवरील अबकारी कर १९.९० रुपये झाला आहे तर डिझेल वरील केंद्रीय कर १५.८० रुपये राहिला आहे.

म्हणजे आता केलेली ८ आणि ६ रुपयांची कपात ही मोदी सरकारने केलेली धूळफेक आहे. या कर वाढीतून मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून २७ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून लुटले आहेत, असा आरोप प्रा डॉ कायंदे यांनी केला.

प्रा डॉ कायंदे पुढे म्हणाल्या, केंद्रीय अबकारी करात केंद्रीय बेसिक अबकारी कर असतो आणि तो राज्य सरकारसोबत शेअर केला जातो. त्यानंतर असतो विशेष अबकारी कर, अतिरिक्त अबकारी कर आणि सेस. एकूण अबकारी कराच्या ६८ टक्के इतका शेअर असलेले हे तिन्ही कर थेट केंद्राच्या तिजोरीत जमा होतात.

मोदी सरकारने आता हे कर कमी केले आहेत ते बेसिक अबकारी कर आहे. याचा अर्थ राज्याच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील कर कमी करावे अशी मागणी करणारे राज्यातील भाजप नेते राज्याच्या तिजोरीवर अप्रत्यक्ष डल्ला मारत आहेत, असा थेट आरोप शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी केला आहे.

Views: 455
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)