हायर अँड फायर योजना अनेक प्रश्न निर्माण करेल: स्वाती मोराळे
वयाच्या सतराव्या वर्षी फौजी प्रशिक्षण द्यायचे, चार वर्षे चाळीस हजार प्रती महिना मानधन द्यायचे आणि वयाच्या एकवसाव्या वर्षी हा फौजी रिटायर होणार. मग रिटायर फौजीना कोणी मुलगीही देणार नाही. सतराव्या वर्षी विद्यार्थी बारावी करून बाहेर पडणार म्हणजे त्याचे पुढचे शिक्षणही अर्धवट राहणार. त्यापुढे त्याला ना नौकरी, ना शिक्षण, ना बायको योजना, ना देशभक्त अशी या तरुणांची अवस्था होणार.
लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली व शेतकरी आणि जवानांना प्रोहत्सान दिले तर मोदी सरकारने शेतकरी कायदे व अग्नीवीर कायदे करून यांना संकटात टाकले आहे. नोटबंदी, खाजगीकरण अशा योजना देशाला हानिकारक कारक झाल्या आहेत. नोटबंदी ने व्यापार्यांचे कंबरडे मोडले. व्यापारी देशोधडीला लागले. अंबानी अडाणी सोडुन सर्वच व्यापारी अडचणीत आले आहेत.
अग्निपथ योजना समाजाचे सैन्यीकरन करणे, बेरोजगारीवर उतारा की लष्करी खर्चात बचत करणे हा हेतु आहे हा प्रश्न पडला आहे. कंत्राटी शिक्षक, कंत्राटी पोलिस आणि आत्ता कंत्राटी फौजी यातुन सर्वच क्षेत्रात अवमूल्यन होणार आहे.
सतराव्या वर्षी युवकाच्या हातात नौकरी न देता बंदूक दिली तर युवक हिंसेकडे वळेल. बनवायला जाऊ देशभक्त आणि बनेल दहशतवादी. ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या काळात युवकाच्या हातात बंदुक, ज्या काळात नौकरी त्यावेळी बेरोजगारी हाती देत आहोत. आणि ज्या काळात युवकाला स्थिरता देणे आवश्यक आहे तिथे त्यांना अस्थिर बनवत आहोत. एक परिपूर्ण सैनिक बनवण्यासाठी त्याला सात वर्षे प्रशिक्षण द्यावे लागते. मग चार वर्षे प्रशिक्षण देऊन आपण चांगला सैनिक बनवु शकु का? याचमुळे आज अग्निपथचा अग्निकुंड धगधगत आहे. दोनशे पेक्षा जास्त ट्रेन पेटवल्या आहेत. देशाचे सातशे कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हायर अँड फायर योजना आणुन देशभक्त तर तयार करु शकणार नाही परंतु दहशतवादी बनण्याचे ट्रेनिंग देणार अहोत.







