• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा जागर आणि स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत साहित्य संमेलन—/माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख .

माणगंगा by माणगंगा
June 20, 2022
in सांगली
0
डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा जागर आणि स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत साहित्य संमेलन—/माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख .

डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा जागर आणि स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत साहित्य संमेलन—/माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख .

आटपाडी ;


डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा चौमुलखी जागर व्हावा आणि त्यांचे राज्याला प्रेरक ठरेल असे स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत दोन दिवसीय साहित्य संमेलन घेतल्याचे उदगार संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी काढले .


डॉ .शंकरराव खरात यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त ११ आणि १२ जुलै रोजी जन्मशताब्दी साहित्य संमेलन होणार असून त्यानिमित्ताने बाबासाहेब देशमुख सुतगिरणीवर आयोजित आढावा बैठकीत राजेंद्रआण्णा देशमुख हे बोलत होते .


मराठी साहित्य विश्वात माणदेशी साहित्य आणि साहित्यीकांना मोठे स्थान आहे . आपल्या भागातून ५ मान्यवर साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हे आपणास भुषणावह आहे . त्यानंतरच्या पिढ्यातील साहित्यीक लेखक, कवी,कथा, कादंबरीकार, चित्रपट नाट्य क्षेत्रातील मान्यवर, आत्मचरित्रकार, कलांवत अनेकांनी देशभर नावलौकीक केला . या उज्वल परंपरेला साजेल असे साहित्य संमेलन आपण सर्व जण मिळून करूया . या साहित्याच्या प्रवाहात येताना सर्व जण जात, पात, धर्म, गरीब, श्रीमंत, पक्ष संघटना असे कसलेही भेद न ठेवता माणदेशी साहित्य प्रेमी म्हणूनच आपण सर्व जण एकत्र आलो आहोत . हीच भावना कायम ठेवून साहित्याच्या मोठ्या परंपरेला आपण नेहमीच समर्थन साथ देवूया . असे स्पष्ट करून राजेंद्रआण्णा देशमुख यांनी, निष्ठेने, एकसंघ भावनेने, आपण साहित्य क्षेत्रात कार्यरत राहीलो तर भविष्यात माणदेश आणि आटपाडी संपूर्ण विश्वात साहित्य नगरी, प्रेरक नगरी, मार्गदर्शक नगरी, स्मारक नगरी म्हणून नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही . असे ही राजेंद्रआण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले .


यावेळी डॉ रविंद्र शंकरराव खरात यांनी संमेलनासाठी एक लाख रुपयेचा धनादेश दिला . पुण्याचे दयानंद सोनकांबळे यांनी पाच हजार रुपये दिले तर प्रा .डॉ . कृष्णा इंगोले यांनी पाच हजार रुपयेची देणगी जाहीर केली .
यावेळी आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीरावतात्या पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक , डॉ . रविंद्र खरात , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुण वाघमारे, साहेबराव चवरे, भाजपाचे नेते आप्पासाहेब काळेबाग, स्नेहजीत पोतदार, डॉ . कृष्णा इंगोले डॉ. सयाजीराजे मोकाशी, सुभाष कवडे, कुमार लोंढे, मंगलनाथ देशमुख, सुरेश बालटे, रणजित ऐवळे इत्यादींनी सुचना मांडल्या .


यावेळी प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके,प्रा . सीताराम सावंत, अरविंद चांडवले , प्रा. सुनिल दबडे, माजी प्राचार्य तानाजीराव वाघमारे, वसंतराव विभूते, दयानंद सोनकांबळे पुणे, आप्पासाहेब खरात, विठ्ठलराव लांडगे, दादासाहेब कदम, डॉ कुमार लोंढे, रविकिरण जावीर, स्नेहजीत पोतदार, रणजीत ऐवळे, डॉ . यु .एस . चंदनशिवे, शिवाजीराव बंडगर, रमेश जावीर, भीमाशंकर स्वामी, साहेबराव चंदनशिवे नवनाथ जावीर, रविंद्र लांडगे, विशाल काटे, जोतिराम काटकर,नामदेव खरात, महादेव खरात, विक्रम मोटे, शशिकांत मोटे, समाधान खरात, विवेक सावंत, सनी कदम, आबा ऐवळे, संतोष वाघमारे, समाधान खरात, शशिकांत मोटे, विक्रम मोटे, सुरेंद्र कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Views: 254
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
१ जुलैपासून राज्यात स्मार्ट कार्ड अनिवार्य होणारस्मार्ट कार्ड नसल्यास मिळणारे शासकीय लाभ बंद होणार….…आधारकार्डावर जेष्ठ नागरिकांना आता प्रवास करता येणार नाही;जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव यांची माहिती

१ जुलैपासून राज्यात स्मार्ट कार्ड अनिवार्य होणारस्मार्ट कार्ड नसल्यास मिळणारे शासकीय लाभ बंद होणार....…आधारकार्डावर जेष्ठ नागरिकांना आता प्रवास करता येणार नाही;जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)