• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

१ जुलैपासून राज्यात स्मार्ट कार्ड अनिवार्य होणारस्मार्ट कार्ड नसल्यास मिळणारे शासकीय लाभ बंद होणार….…आधारकार्डावर जेष्ठ नागरिकांना आता प्रवास करता येणार नाही;जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
June 20, 2022
in महाराष्ट्र
0
१ जुलैपासून राज्यात स्मार्ट कार्ड अनिवार्य होणारस्मार्ट कार्ड नसल्यास मिळणारे शासकीय लाभ बंद होणार….…आधारकार्डावर जेष्ठ नागरिकांना आता प्रवास करता येणार नाही;जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव यांची माहिती

१ जुलैपासून राज्यात स्मार्ट कार्ड अनिवार्य होणारस्मार्ट कार्ड नसल्यास मिळणारे शासकीय लाभ बंद होणार

आधारकार्डावर जेष्ठ नागरिकांना आता प्रवास करता येणार नाही;जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव यांची माहिती

त-हाडी
प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील नागरिकांनी एक जुलैपर्यंत तात्काळ स्मार्ट कार्ड काढून घ्यावे नसता आपल्याला जेष्ठ नागरिक म्हणून आता आधार
कार्डावर प्रवास करता येणार नाही.
या सवलतीचा ६५ पेक्षा जास्त वयाचे अनेक ज्येष्ठ नागरिक फायदा घेतात. परंतु त्यासाठी योग्य कागदपत्रे सादर करण्याची गरज असते. अनेक जणांकडे आधार कार्ड किंवा वया बाबत वयाचा दाखला असतो. परंतु यापुढे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, अन्यथा दि. १ जुलैपासून जेष्ठ नागरिकांना प्रवासाची सवलत रद्द करण्यात येईल, असे राज्याचे परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
शासनानी आता सवलतीच्या प्रवासासाठी जेष्ठ नागरिकांसह प्रत्येक नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे.या स्मार्ट कार्ड चा फायदा हा सर्वाधिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. त्यांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास यापुढे सवलत मिळणार नाही. दरम्यान स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता दि. ३० जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. डिजिटल इंडिया’उपक्रमाला हातभार लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २०१८ मध्ये सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. सदर योजना लागू झाल्यानंतर विनाकार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले आहे. कोरोनासह विविध कारणांनी या योजनेला मुदतवाढ मिळत गेली. मात्र, यावेळी दिलेली मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया

विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या माध्यमातून साधारणतः २९ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये ही सवलत लागू केली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजार असलेले रुग्ण, स्वातंत्र्यसैनिक, विविध पुरस्कारप्राप्त आदींना या सवलतीचा लाभ दिला जातो. दरम्यान, या सवलतीसाठी प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’अनिवार्य करण्यात आले आहे. ६५ वर्षावरील नागरिक एसटी सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येतो

— अध्यक्ष डॉ लखीचंद फकिरा जाधव

-जेष्ठ नागरिक संघ त-हाडी

कोट
महामंडळाने या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यापूर्वी ३१ मेपर्यंत मुदत होती. दरम्यान, आता ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याने १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’बंधनकारक करण्याचे ठरवले आहे.’स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ३१ मे २०२२ ही अंतिम मुदत होती. परंतु, ३० मे रोजी ही मुदत ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे १ जुलैपासून ‘स्मार्ट कार्डा’शिवाय कुणालाही सवलत मिळणार नाही. राज्यात सध्या एसटीने प्रवास करणाऱ्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांकडे ‘स्मार्ट कार्ड’ नाही. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक एसटी सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या तिकीट दरात प्रवास करता येतो

वर्षा पावरा
आगार प्रमुख
शिरपूर बस आगार

Views: 418
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी!भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी!
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)