• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य चा द्वितीय वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा ….महाराष्ट्रातील ३० सामाजिक संस्थांना प्रदान केला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार.

माणगंगा by माणगंगा
November 22, 2022
in मुंबई
0
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य चा द्वितीय वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा ….महाराष्ट्रातील ३० सामाजिक संस्थांना प्रदान केला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार.

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य चा द्वितीय वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा

महाराष्ट्रातील ३० सामाजिक संस्थांना प्रदान केला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार.

बदलापूर दि. २० नोव्हेंबर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य या समाजिक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या स्वरूपात बदलापूर येथे काल पार पडला. संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर आणि संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी हा वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने करण्याचा मानस ठेवून राज्यातील विविध ३० सामाजिक संस्थांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक संस्थांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या पाठीवर पुरस्काररुपी कौतुकाची थाप देणारी जनजागृती सेवा समिती ही एकमेव संस्था ठरली.


जनजागृती सेवा समितीच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची माहितीपर चित्रफीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जनजगृती सेवा समितीने दोन वर्षात खूप चांगली भरीव कामगीरी केल्याचे यातून उपस्थितांना समजले.


या वर्धापण दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिलीप नारकर, रामजीत गुप्ता, शिवराम चव्हाण, ज्ञानेशानंद शास्त्री महाराज, श्री राजेश कदम, अमित दुखंडे, सिद्धी कामत, प्रेरणा गावकर आदी मान्यवर तसेच राज्यभरातून विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


श्री विजय वक्ते हे या समारोहाचे प्रमुख पाहुणे होते.
जनजागृती सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर, सचिव सौ. संचिता भंडारी आणि पदाधिकारी यांना उपस्थित मान्यवर आणि संस्थाचालकांनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी काळातील संस्थेच्या विविध सामाजीक उपक्रमांची माहिती श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी दिली, तसेच संपूर्ण राज्यभर संस्थेचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये संस्थेचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरातून सामाजिक कार्यात आवड असलेल्या अनेक लोकांचा सम्पर्क होत असून लवकरच राज्यभर संस्थेचे कार्य सुरू होईल असा विश्वास संस्थापकांनी दिला.
कार्यक्रम यशस्वीरित्या सम्पन्न होण्यासाठी दीपक वायंगनकर, एकनाथ गायकर, सचिन भंडारी, प्रसाद उकार्डे, भावना परब, कनिष्का कडूलकर, मेघा भालेकर, शुभम नेटके, महेश्वर टेतांबे, सौरभ टकले आणि गंधाली तिरपणकर यांनी विशेष योगदान व सहकार्य केले.
प्रमाणपत्र, शिल्ड आणि गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता काटकर यांनी केले. प्रस्तावना संस्थेच्या सचिव सौ. संचिता भंडारी यांनी केली. आणि आभार प्रदर्शन खजिनदार श्री दत्ता कडुलकर यांनी केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 126
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रा . कविता म्हेत्रे यांच्या स्त्रीजाणिवेच्या दमदार कविता .

प्रा . कविता म्हेत्रे यांच्या स्त्रीजाणिवेच्या दमदार कविता .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)