• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रा . कविता म्हेत्रे यांच्या स्त्रीजाणिवेच्या दमदार कविता .

माणगंगा by माणगंगा
November 22, 2022
in सांगली
0
प्रा . कविता म्हेत्रे यांच्या स्त्रीजाणिवेच्या दमदार कविता .

स्त्री शिकली . विचार करू लागली . बोलू लागली . लिहू लागली . विविध क्षेत्रांत तिने गगनभरारी घेतली . एक स्त्री शिकली की सारे कुटुंब सुधारते हा विचार फुले दांपत्यांनी दिला आहे . कुटुंबाला , समाजाला पर्यायाने देश सुधारण्यात स्त्रीचा मोलाचा वाटा आहे . एकीकडे स्त्रीची ही गरुडभरारी आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागांत आजही स्त्रीला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या पुरुष मानसिकतेच्या जोखडाखाली स्त्री चाचपडताना दिसून येत आहे . तिचं जगणं अजूनही असुरक्षित आहे . दुःख , वेदना आणि कष्टानं भरलेलं जगणं , बोकाळलेला दहशतवाद, सडत चाललेली समाजव्यवस्था , दुःख भोगून कणखर होत चाललेली स्त्री दिसत आहे . अशा ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याचं भिषण वास्तव मांडणारा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला .
” अस्वस्थ दिवसांची सुगी ” . असे त्या कविता संग्रहाचे नाव आहे . हा कवितासंग्रह प्रा . कविता म्हेत्रे यांनी लिहीला आहे . प्रभादेवी मुंबईचे लोकवाङ्मय गृह या प्रकाशनातर्फे हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे . सतीश भावसार यांचे सुंदर मुखपृष्ठ आहे .


सलणारे दिवस , निरगाठीचे दिवस, सलगीचे दिवस आणि अगतिक दिवस अशा चार भागांत कवितासंग्रहातील कविता विभागल्या आहेत . सलणारे दिवस या भागात बाईपणाच्या कविता आहेत . निरगाठीचे दिवस या भागात स्वगत कविता आहेत . सलगीचे दिवस या भागात प्रेम कविता आहेत . अगतिक दिवस या भागात सामाजिक वळणाच्या कविता आहेत .
कवितासंग्रहात स्त्री जाणिवेच्या दमदार कविता आहेत . कवयित्री ह्या माणदेशातील म्हसवडच्या आहेत . त्यामुळे माणदेशी स्त्रीच्या जगण्याचं भिषण वास्तव त्यांनी कवितेतून मांडलं आहे . कवितेला चिंतनशिलतेची बैठक आहे . माणदेशी स्त्रीमनाच्या संचिताचा प्रवाह त्यांनी या संग्रहाच्या रूपाने वाचकांपर्यंत पोहचविला आहे .


घर सावरणारी ताठ मानेची आणि ताठ कण्याची, धाडशी कष्टाळू , सोशिक खंबीर स्त्री त्यांच्या कवितांतून दिसून येते . माणदेशी स्त्रीकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे , तिचा आधार झालं पाहिजे , तिचा सन्मान झाला पाहिजे अशी तळमळ प्रा म्हेत्रे यांच्या लेखनातून दिसून येते .
कवितासंग्रहातील कविता दुर्दम्य आशावादाच्या कविता आहेत . ” माणगंगे माय ” . या कवितेत प्रा . म्हेत्रे म्हणतात … ,
” शेणामातीच्या घरात येऊ दे
आता दुधदुभत्याचा वास
शहरगावाला शिकणाऱ्या पोराच्या
डब्यात जाऊदे तूप पोळीचा घास ” .
लेक शिकवा , शाळेत पाठवा असा मंत्र ग्रामीण भागांत जागोजागी दिसून येतोय . लेकीसाठी कष्ट उपसणाऱ्या बापाची व्यथा ” पोरीचा बाप ” . या कवितेतून मांडण्यात आली आहे .
” बाप पिसतो कष्ट
उपसत राहतो जन्माची माती
पोरीच्या हातात देता यावी
खुरप्याच्या जागी पुस्तक पाटी ” .
” विद्रोह ” या कवितेतील बंडखोर विचार वाचकांना अंतर्मुख करतात .
” बाई म्हणून तिला नाकारणाऱ्या कुणालाही
मग पुरुष , समाज , संस्कृती
धर्मालाही
अगदी कुणालाही ती उखडून टाकेल मुळासकट
सहज … ” .


माणदेशात दुष्काळ असूनही शेतकरी आत्महत्या करीत नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या मर्दानी कारभारणी . दुःख भोगूनही कणखर झालेल्या कारभारणी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतात . अशा स्त्रियांचे दमदार चित्रणही या संग्रहात पाहायला मिळते .


प्रा . कविता म्हेत्रे या ज्ञानदान करून पिढी घडवित आहेत . त्या राजकीय व सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत . ” मी सावित्री बोलतेय ” . हा त्यांचा एकपात्री प्रयोग राज्यात व राज्याबाहेरही सध्या गाजतोय .
” अस्वस्थ दिवसांची सुगी ” . या कविता संग्रहातील कवितांतून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे .
त्यांच्या लेखनाला माझ्याकडून शुभेच्छा .

प्रा . सुनील दबडे

Views: 110
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभूतवाडीतील सभामंडपासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी – सरपंच चंद्रकांत पावणे

बनपुरीत आम. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सभागृहासाठी दहा लाखाचा निधी ---
सरपंच सुनीता पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)