ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता.आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी तालुक्यातील युवकांनी चंग बांधला आहे. तर वैभव दादा पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत असे राष्ट्रवादीचे तालुक्याचे सरचिटणीस विजय अनुसे यांनी या वेळेला उदगार काढले
काहीही झाले तरी यंदा वैभव पाटील यांना आमदार करायचे असा निर्धार नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत केला आहे. या बैठकीत समाधान पाटील तालुका अध्यक्ष (ओ बी सी सेल), आटपाडी तालुका सामाजिक न्याय सेल उपाध्यक्ष नितीन वाघमारे,विकी बेरगळ युवक तालुका कार्याध्यक्ष,सुखदेव खताळ कार्यकारणी तालुका सदस्य, विजय अनुसे तालुका सरचिटणीस,सचिन राजमाने विटा अर्बन संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
मागील काही वर्षात ॲड. वैभव पाटील यांनी आटपाडी तालुक्यात संपर्क वाढवला आहे. तळागाळातील कार्यकर्त्याला भेटून पुन्हा मुख्य प्रवास आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत दोन्ही तालुक्याला परिचित आहे.
त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांनी विटा महानगरपालिकेला स्वच्छता अभियान अंतर्गत देश पातळीवरील अनेक पुरस्कार दिले आहेत.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये विटा शहराने प्रथम क्रमांक मिळविला. व त्यांचा नवी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पालिकेला पुरस्कार मिळाला होता.
सातत्याने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विटा व परिसरात काम करतात . या स्वच्छता अभियानात देशातील स्वच्छ शहर म्हणून दिल्ली येथे पारितोषिक मिळाले होते. दोन वर्षांपूर्वी देशात चौथा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर आपल्या पुढे तीन नंबर आहेत. ते मागे टाकून एक नंबरला विटा शहर येईल. त्यादृष्टीने खूणगाठ बांधून गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यास शहरातील नागरीकासह सर्व घटकांचा प्रतिसाद मिळत आहेत.
विटा शहर नंबर वनला राहण्यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या विचाराने व माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.
या विटा शहराप्रमाणेच खानापूर आटपाडी मतदार संघत सुद्धा विकास कामाचा डोंगर उभा करायचा ध्यास एडवोकेट वैभव पाटील यांनी घेतला आहे भविष्यामध्ये मतदारसंघातील विकास कामाच्या जोरावर खानापूर आटपाडी मतदारसंघाला सुद्धा पुरस्कार मिळू शकतो.
यासाठीच एडवोकेट वैभव पाटील यांना आमदार करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही आटपाडी तालुक्यातील युवकांच्या माध्यमातून युवकांची फळी बांधत आहोत व येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातून मताधिक्य देऊ असा विश्वास( राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्या झालेल्या बैठकीमध्ये निर्धार करण्यात आला.