सादिक खाटीक यांचा राजेंद्रआण्णा देशमुख यांना पाठींबा आधूनिक बळीराजा – भगिरथ ! राजेंद्रआण्णा देशमुख यांनाच विजयी करा…
आटपाडी दि . १७ ( प्रतिनिधी )
टेंभूला निर्णायक टप्यात आणणाऱ्या आणि प्रचंड औदार्याचे प्रतिक असलेल्या *आधूनिक भगिरथ – बळीराजा !, राजेंद्रआण्णा देशमुख* यांनाच विजयी करा . असे भावनिक आवाहन, *विसापूर सर्कल सह खानापूर, आटपाडी तालुक्यातील मतदार बंधू – भगिनींना,* आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते, ज्येष्ट पत्रकार तथा मुस्लीम खाटीक समाजाचे राष्ट्रीय नेते सादिक खाटीक यांनी केले आहे .
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी आणि विशेषत खानापूर विधानसभा मतदार संघातल्या जनतेशी फेसबुक, वॉटसअप या सोशल मिडीयाच्या पोस्टच्या माध्यमांतून संवाद साधताना सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघ वगळता, महाराष्ट्रातील इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील, *महाविकास आघाडीच्या* सर्व, सर्वमान्य उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहनही मी, राज्यातील सुज्ञ जनतेला विशेषतः बहुजन समाज, उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्याक बांधवांना करीत आहे . जिथे महाविकास आघाडीतीलच दोन घटक पक्ष एकमेकां विरुद्ध लढत असतील अशा ठिकाणी मतदार बांधवांनी सदसदबुध्दीला अनुसरून महाविकास आघाडीच्या दोहोपैकी कोणत्याही उमेदवारास मतदान करावे . सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ . बाबासाहेब देशमुख आणि पंढरपूर येथील काँग्रेस आयचे उमेदवार आणि आमच्या आटपाडीचे जावईबापू भगिरथ भालके यांनाच विजयी करावे, असे आवाहनही प्रारंभीच सादिक खाटीक यांनी केले आहे .
देशाच्या स्वातंत्यपूर्व काळात औंध संस्थानाच्या मंत्रिमंडळात रस्तुमरावबापू देशमुख आणि अमिनोद्दीन उर्फ बाळाभाई कुरेशी हे दोघे आटपाडीकर मंत्री, आमदार होते. सांगली, सातारा जिल्ह्याच्या लोकल बोर्डावर उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या आटपाडीकर रस्तुमरावबापू देशमुख यांच्या माध्यमातल्या पदांच्या कालखंडानंतर, खानापूर विधानसभा मतदार संघातल्या विधानसभेच्या आटपाडी तालुक्याच्या साथीने एकूण १३ निवडणूकांमध्ये फक्त १ वेळा अर्थात १९९५ ची आमदारकी आटपाडी तालुक्याच्या राजेंद्रआण्णा देशमुख यांना बंडखोरीतून मिळाली होती .
मात्र या १३ पैकी १२ वेळेस खानापूर तालुका वाशीय मान्यवर आमदार झाले होते . याउलट, दोन वेळच्या विधानसभा निवडणूकीसाठी कवठेमहंकाळ तालुक्याशी *आटपाडीला* जोडले गेले असताना, एक वेळ लिंगायत समाजाचे राज्याचे नेते, कै . बी . एस . कोरे साहेब हे कवठेमहंकाळकर, आटपाडी तालुक्याच्या सहकार्याने आमदार म्हणून निवडून आले आणि दुसऱ्या टर्मला याच मतदार संघातून धनगर समाजाचे राज्याचे नेते, कै . आण्णासाहेब लेंगरे हे आटपाडीकर, कवठेमहंकाळ तालुक्याच्या सहकार्याने आमदार झाले होते . फक्त दोनच वेळच्या निवडणूकीत कवठेमहंकाळ आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांना आलटून पालटून आमदारकी मिळाली होती . या दोन्ही निवडणुकीत आटपाडी तालुक्याचे नेते कै . बाबासाहेब देशमुख यांची भूमिका निर्णायक , लक्षवेधी, आणि नेतृत्वाची चुणूक दाखविणारी ठरली होती .
खानापूर तालुक्याचाच, आटपाडी तालुका हा पूर्वी एकत्रित भाग असताना आणि नंतर आटपाडी तालुका स्वतंत्र झाल्यानंतरही, आटपाडी तालुका हा, खानापूर विधानसभा मतदारसंघाचा १३ वेळा सहकारी असताना फक्त एक वेळा आणि ती ही बंडखोरीतून आटपाडी तालुक्याला आमदारकी खेचून आणावी लागली, हे आटपाडी तालुक्याचे मोठे दुर्देव होते . आटपाडी तालुक्याचे शिल्पकार, तत्कालीन समाजवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष कै . बाबासाहेब देशमुख यांनी १९८०, १९८५ च्या निवडणूकीत केलेल्या सहकार्याचा, १९९५ च्या निवडणुकीत त्यांच्या मुलाला सहकार्य करत विटेकरां कडून पैरा फेडण्यात आला होता . वास्तवीक आटपाडी तालुक्याला आणखी सहा वेळा आमदारकी मिळायलाच हवी होती किंवा विधानपरिषद, राज्यसभेवर किमान ६ वेळा आटपाडी तालुकावाशीय नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती . परंतू विभागीय, जिल्हा, राज्य नेतृत्वाला आटपाडी तालुक्याच्या संदर्भाने कधी पाझर फुटलाच नाही . मंत्रीपद दर्जाच्या महामंडळाच्या पदासाठी अथवा लाल दिव्याच्या गाडीचा दर्जा असलेल्या इतर कोणत्याच पदांसाठी आटपाडी तालुका वाशीय पात्रतेचा वाटला नाही . सख्या भावा भावासारखे राहणाऱ्या, वागणाऱ्या कै . बाबासाहेब देशमुख , कै . आण्णासाहेब लेंगरे यांच्यात उभी पाडण्यात तत्कालीन वरिष्ट नेते मंडळी यशस्वी झाली होती . विधानपरिषदेवर आमदार करतो, मंत्री पदावर वर्णी लावतो .
अशा भुलभुलैयातून या दोन्ही नेत्यांच्या विस्तारलेल्या राजकारणाला मर्यादित करण्यात आले होते. गेल्या काही विधानसभा निवडणूकीत असणाऱ्या *” खानापूर – आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या “* नावातून *आटपाडी* हे नाव काढून टाकण्यात आले . *एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणूकीचे, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया आटपाडी तहसील कार्यालयातूनच होत असायची .” हे ही निवडणूक प्रक्रियेचे सर्व सोपस्कर आटपाडीतून विटा येथे नेण्यात आले .* हा ही एकप्रकारचा आटपाडी तालुक्यावरचा अन्याय, खानापूर तालुक्यातील तत्कालीन आमदार महोदयांना दिसला नाही. आणि हा अन्याय आहे, हे ही त्यांना वाटले नाही . हे सर्व घडत असताना त्यावेळी आटपाडी तालुक्यातील मान्यवर या मतदार संघाचे आमदार असते तर, त्यांनी याविरुद्ध प्रचंड आवाज उठविला असता. किंबहूना हा अन्याय होवू दिला नसता . पण हा अन्याय शासकीय स्तराच्या सोपस्करातून आटपाडी तालुक्यावर लादण्यात आला. हे अत्यंत दुर्देवी असल्याचे सादिक खाटीक यांनी अतिशय खिन्नतेने म्हंटले आहे .
खानापूर तालुक्याचे मतदान ६५ टक्के आहे आणि आटपाडी तालुक्याचे मतदान ३५ टक्के आहे, अशी आटपाडी तालुक्यावर अन्याय करणारी आणि श्रेष्ठींची दिशाभूल करणारी भूमिका दीड महिन्यांपूर्वी एका युवा नेत्याने अनेक मान्यवरांसमोर मांडली होती . अप्रत्यक्षरित्या खानापूर तालुक्याचे मतदान जवळ जवळ दुपटीने असल्याचे ठासून सांगत या मतदान संख्येवरून खानापूर तालुका वाशीयच आमदार होवू शकतात. अशी आटपाडी तालुक्याच्या वास्तव मतदान संख्येवर आणि आटपाडी तालुक्याच्या नेतृत्वावर अन्याय करणारी भूमिका छातीठोकपणे मांडताना हे नेतृत्व दिसले. आटपाडी तालुक्यावर आपण अप्रत्यक्षपणे अन्याय करत रेटून खोटे बोलतोय, अनेक नेत्यांची दिशाभूल करतोय याचेही त्या नेत्याला भान राहीले नाही, हे दुर्देव होते. खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल यांनी एकत्रीत बनलेल्या खानापुर विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या ३ लाख ४७ हजार ४०५ इतकी आहे . यापैकी खानापूर तालुक्याचे मतदान १ लाख ६२ हजार ५६० इतके आहे . एकूण मतदार संख्येत खानापूर तालुक्याची टक्केवारी ४६ . ७९ टक्के इतकी आहे . आटपाडी तालुक्याचे मतदान १ लाख ३८ हजार ४२३ इतके आहे . एकूण मतदार संख्येत आटपाडी तालुक्याची टक्केवारी ३९ . ८४ टक्के इतकी आहे . तर विसापूर सर्कलचे मतदान ४६ हजार ४२२ इतके असून या विसापुर सर्कलच्या मतांची टक्केवारी १३ . ३६ टक्के इतकी आहे . हे वास्तव असताना *खानापूर तालुक्याच्या मतांची टक्केवारी ६५ टक्के आहे . असे सांगताना ” विसापूर सर्कलचे ४६ हजार ४२२ हे पुर्ण मतदान आणि आटपाडी तालुक्यातील १६ हजार ८३१ मतदान ” खानापूर तालुक्यात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .* हे दुर्देवी आहे, अन्यायी आहे .
अशी आटपाडी तालुक्याविषयी भरभरून अनास्था असणारा हा युवक नेता भविष्यात आटपाडी तालुक्याला न्याय देईल का ? याचे उत्तरही प्रत्येकाने अजमावून बघावे . पूर्वी आमदार झालेल्या नेत्याच्या गावच्या एका सर्वसामान्य युवकाला *नमस्ते आमदार साहेब !* अशी मी मारलेली हाक, आटपाडी तालुक्या विषयी आकस, अनास्था असणाऱ्या त्या युवक नेत्याला अस्वस्थ बनवती झाली . बेचैनीतून त्यांनी काढलेले उदगार त्यांची औकात स्पष्ट करणारे होते .
स्वातंत्र्यावेळी तरुण असणारी अनेक नेतेमंडळी हे जग सोडून गेली, स्वातंत्र्यानंतरच्या पंचवीशीत तरुण असणारे *अनेक सभापटू, घसा फोडून, फोडून, हतबल, निराश, बधिर होत आता विश्रांतीच्या प्रवासाकडे वाटचाल करीत आहे .* आणि आजच्या घडीला , चाळीशी ते साठी पर्यंतच्या अनेक आटपाडी तालुका वाशीय नेत्यांना अनेक स्तरावर मोठी धोबी पछाडच वाटणीला आल्याचे दशकाच्या वाटचालीचा आढावा घेताना जाणवते . याला एकमेव सन्माननीय अपवाद म्हणजे भाजपाकडून आटपाडी तालुका वाशीय नेतृत्वाला विधानपरिषदेवर दिली गेलेली आमदारकी होय. याकडेही सादिक खाटीक यांनी आवर्जून लक्ष वेधले .
स्वतंत्र आटपाडी तालुक्याची निर्मिती , स्वतंत्र पंचायत समिती, स्वतंत्र मार्केट कमिटी, स्वतंत्र एस . टी . डेपो, एस . टी . स्टॅन्ड अशा अनेक आटपाडी तालुक्याच्या विकासाच्या गोष्टी मिळविताना आटपाडी तालुक्याच्या नेतृत्वाला अर्थात बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड विरोध केला गेला होता. राज्यात आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड ताकद असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आमदार, नामदारांचा प्रचंड विरोध अंगावर घेत आटपाडी तालुक्यासाठी भल्यासाठीच हे नेतृत्व आयुष्याच्या अखेरी पर्यंत झुंजले . प्रचंड कट कारस्थाने करत येथील तत्कालीन नेतृत्वाला वरिष्ठांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता . आजही आटपाडी तालुक्याच्या स्वाभीमान, कणखर नेतृत्वाला दाबण्याचे, कुजवण्याचे, गुलाम बनविण्याचे प्रयत्न होताना दिसताहेत, हे मोठे धक्कादायक दुर्देव आहे .
आटपाडी तालुक्याबरोबर माणदेशाचे वैभव ठरेल अशा माणगंगा सहकारी साखर कारखान्याची, शासनकर्त्यांच्या उदासीनतेने वासलात लागली . शेतीच्या पाण्याची प्रचंड वाणवा असल्याच्या पार्श्वभूमीवर, या कारखान्याची उभारणी केली गेली . शे – दीडशे किलोमीटर वरून उस आणणे, भागातल्यांच्या दबावातून केली गेलेली वाढीव नोकरभरती, कारखाना चालु ठेवण्यासाठी करावे लागलेले इतर सर्व यातायात . विरोधी राजकारण्यांकडून आणले जाणारे अनेक अडथळे , यातूनही *तीन दशके* हा कारखाना चालविण्याचे दिव्य कारखान्याच्या नेतृत्वाने केले. राजेवाडी जवळच्या कारखेल परिसरातून जाणाऱ्या नीरेच्या कॅनॉलच्या पाण्याची राजेवाडीत आणण्याची व्यवस्था १९९० च्या आसपास झाली असती आणि हे पाणी आटपाडी तालुक्यातील सर्व तलावांना जोडणाऱ्या *तलाव जोड* योजनेतून संपूर्ण आटपाडी तालुक्यासह लगतच्या सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वत्र दिले गेले असते तर माणगंगेने सधन काठच्या कारखान्यां बरोबर निश्चितच नैतिक स्पर्धा केली असती .या कारखान्याला जोडूनच इतर उपपदार्थ बनविणारे शक्य होतील तेवढे प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प, कार्यक्षेत्रातील पडीक, शासकीय जमीनींवर, डोंगरांवर, या कारखान्याच्या बळकटीसाठी म्हणून पवन उर्जा निर्मिती प्रकल्प आणि अन्य उजाड, मोकळ्या, अगदी कॅनॉल, तलाव पात्रे आच्छादले जातील अशा दृष्टीने सौर उर्जेचे जाळे उभारले असते तर माणगंगा साखर कारखान्यासाठी ते उत्पन्नाचे प्रचंड स्त्रोत ठरले असते . तथापि अनेकांच्या असहकार्याच्या भूमिकेतून आटपाडी तालुक्याची विकासगंगा गत काही वर्षापासून कर्जबाजारी अवस्थेत गटांगळ्या खात आहे . हे या भागाचे भीषण दुर्दैव आहे .
१९९५ साली आमदारकी मिळालेल्या राजेंद्रआण्णा देशमुख यांनी, इतर अनेक अपक्ष आमदार महोदयांच्या साथीने, प्रचंड दबावाच्या सहकार्यातून आणि चालून आलेले मंत्रीपद नाकारत, तत्कालीन शासनकर्त्यांच्या, धाडशी निर्णयातून टेंभू योजनेचे बहुतांश काम आपल्या एकाच टर्ममध्ये मार्गी लावले होते. एवढेच नव्हे तर १९९५ च्या आमदारकीच्या एकाच टर्म मध्ये मार्गी लागलेली आणि आजही विटे शहराला पुरेसे पडणारी *घोगाव पाणी पुरवठा योजनाही राजेंद्रआण्णा देशमुख यांच्याच कार्याची साक्ष देत आहे .* आधूनिक भगिरथाची, ही कामे वाखाणण्या सारखीच होती आणि त्यानंतरच्या आमदारकीच्या ५ टर्म मध्ये टेंभूचे काम किती टक्के मार्गी लागले, याचाही आढावा प्रत्येक मतदार राजाने घ्यावा, असे माझ्या सारख्याला वाटते . शेतकऱ्यांच्या शेता शिवारापर्यत बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा, राज्याला दिशा देणारा पथदर्शक प्रकल्प शंभर टक्के यशस्वी झाला का ? याचीही उत्तरे प्रत्येक मतदारांनी अजमावीत . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ३२ वर्षाच्या पाणी चळवळीच्या लढ्याचे, *टेंभू* सर्वार्थाने यशस्वी होण्यात योगदान आहे किंवा नाही, याचेही मुल्यमापन मतदार राजाने जरूर करावे . गत ७ दशकात आटपाडी तालुक्याच्या कोणत्याही नेतृत्वाने *खानापूर तालुक्यात गटबाजी केली का ?, खानापूर तालुक्यात गावोगावी राजकारण केले का ?* या उलट खानापूर तालुक्यातील अनेक नेत्यांनी आटपाडी तालुक्यात गटबाजीच्या राजकारणात आटपाडी तालुका खिळखिळा केल्याचे सर्वांच्याच लक्षात येईल . खानापूर तालुक्यात अनेक मातब्बर राजकारणी परिवार आपले अस्तित्व टिकवून होते . या परिवारांचे राजकीय अस्तित्व उखडायला कोणी आटपाडी तालुका वाशीय नेते मंडळी तिकडे गेली नव्हती . आटपाडी तालुक्याचा प्रचंड विकास केल्याची आकडेवारी ठोकून सांगणाऱ्यांच्या नजरेत मतदार संघातले बंद पडलेले कारखाने, रसातळाला गेलेले यंत्रमाग उद्योग, देशभर नावाजला गेलेला आणि आता लुप्त होवू पाहणारा पोल्ट्री उद्योग, का येत नाहीत . दोन तालुक्यातल्या एमआयडीशी संदर्भातल्या अनेक निवडणूकातल्या वल्गनांनी जनताही आता त्रासली आहे . लगतच्या माण तालुक्यातल्या म्हसवड जवळच्या शेकडो कोटी पेक्षाही जास्त गुंतवणूकीचा *बेंगलोर कॉरीडोर प्रकल्प* गती घेऊ पाहतोय. असाच एखादा प्रकल्प खानापूर , आटपाडी तालुक्यात उभारला जावा .याचे कोणालाही सोयर सुतक नाही . निम्म्या लोकसंख्येच्या माता, भगिनी, युवती, महिलांना, प्रचंड प्रमाणातल्या तरुणाईला शाश्वत काम नाही . या सर्वांना रोजगार हवा आहे , नोकरी हवी आहे , कायम स्वरूपी कामधंदा हवा आहे . शेतीतल्या उत्पन्नाला बाजारपेठ व शाश्वत भाव हवा आहे . असे म्हणणाऱ्या – मागणाऱ्यांच्या संख्येचाही आकडा लाख पार करेल इतका निघू शकतो , तथापि याबाबत काहीच होत नसल्याची प्रचंड उदासीनता हा मतदारसंघ अनुभवतो आहे . राजकीय वारसदारांचे खुंटे बळकटीसाठी चाललेल्या या निवडणूकीचे चित्र मन सुन्न करत आहे . १९९५ च्या एकाच टर्म मध्ये प्रचंड काम केलेल्या आणि आपला स्वतः चा पुढच्या १९९९ च्या आमदारकीवर असलेला हक्क सोडून, केवळ राष्ट्रीय नेत्याच्या शब्दाखातर, आपणच पराभूत केलेल्या नेत्याला, पुन्हा निवडून आणण्याचे प्रचंड औदार्य दाखविणारे राजेंद्रआण्णा देशमुख हे महाराष्ट्रात एकमेव उदात्तेचे उदाहरण ठरू शकतील, असे त्यांचे बळीराजा सारखे व्यक्तिमत्व आहे . या आधूनिक बळीराजाने सदैव जनता जनार्दनासाठी चांगुलपणा देत राहण्याचीच भूमिका बजावली आहे . विशेष म्हणजे १९९० पासूनच्या ७ वेळच्या निवडणूका पैकी ४ वेळच्या निवडणूकीत राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या पाठींब्यावर खानापूर तालुकावाशीय आमदार झाले . दोन वेळा त्यांच्या पाठीब्यांचा उमेदवार पराभूतही झाला, हा अपवाद सोडला तर जास्तीत जास्त सहकार्य राजेंद्रआण्णा देशमुख यांचे खानापूर तालुक्यातील नेत्यानांच झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आटपाडी तालुक्याच्या सहकार्याने अनेक वेळा आमदार झालेल्या मान्यवर महोदयांनी राजेंद्रआण्णा देशमुख यांना सोडाच तथापि त्यांच्या आटपाडी तालुक्यातल्या एखाद्या जिगरबाज नेत्याला तरी आमदार करायला हवे होते . विधानसभेची आमदारकी देणे जिवावर येत असेल तर या खानापूर तालुकावाशीय नेत्यांनी, त्यांच्या आटपाडी तालुक्यातील, जिगरबाज *नानाजी, तानाजी – आप्पाजी – दादाजी* वगैरे *गळ्यातल्या एखाद्या ताईताला* तरी विधानपरिषदेची आमदारकी मिळवून द्यायची होती . लाल दिव्याच्या, मंत्री पदाच्या दर्जाच्या महामंडळ अध्यक्ष पदाने तरी, आपल्या कडेवरच्या लाडक्या आटपाडी तालुका वाशीय नेत्याला गौरवायचे होते . पण हे आटपाडी तालुक्याविषयी निखळ प्रेम असेल तरच शक्य आहे ना ? याबाबत खानापूर मतदार संघातल्या मतदार बांधवांनी आवर्जुन चिंतन करावे . शांत, संयमी, जिगरबाज लढवय्या व्यक्तीमत्वाच्या *राजेंद्रआण्णा देशमुख यांना, मागच्या पाच आणि पुढच्या पाच आमदारकीच्या टर्मचे काम, एकाच टर्म मध्ये, नामदारकीच्या प्रचंड ताकदीने पुर्ण करण्यासाठी, त्यांच्या ” ॲटो रिक्शा ” या चिन्हापुढील बटन दाबून* त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या !, असे आवाहनही सादिक खाटीक यांनी शेवटी केले आहे .