विरोधकांनी एक तरी मत जादा घेऊन दाखवावे …सुखदेव खताळ
आटपाडी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच (शरदचंद्रजी पवार गट) नंबर वन ठरणारआटपाडी प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमळी सुरू असल्यापासून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात ज्यावेळेला मतदान घडेल त्याच वेळेला अफवा फसवणाऱ्या नेत्यांना मताची किंमत कळेल.
विभूतवाडी ता. आटपाडी येथील नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये गावातून जास्तीत जास्त मतदान देण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.अनेक नेते मंडळी हवेत आहेत, अशा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही गावातून सर्वात जास्त मतदान देणार असल्याचा निर्धार युवा नेते सुखदेव खताळ यांनी या बैठकीमध्ये केला. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांचे ऐकून आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान केले.
त्यांना कोणताही लगाम नाही ,त्यांनी कुठेही गेले तरी चालते, परंतु आम्ही आमचे तत्व सोडणार नाही. आम्ही आमच्या तत्त्वानेच विधानसभेचे उमेदवार वैभव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि मतदान ही जास्तीत जास्त घडवून आणणार असल्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला. अनेक नेते आम्ही अमुकला लीड देऊ तमुकाला लीड देऊ असे म्हणतात परंतु प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर लीड कुणाला मिळते हे नेत्यांना समजेल.
कुणालाही विश्वासात न घेता कोणतीही पार्टी गट चालत नसतो. सर्वांना विश्वासात घेऊनच गट मोठा होत असतो. परंतु काही नेतेमंडळी कोणाचाही विचार न करता आपापले निर्णय घेतात. त्यामुळे अशा नेत्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वैभव दादा पाटील यांना गावातून विरोधकापेक्षा जास्तीत जास्त मतदान देणार असल्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.