आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरुपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या – माननीय वैभव दादा पाटील.
आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरुपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. एकच ध्यास मतदारसंघाचा विकास असे प्रतिपादन माननीय वैभव दादा पाटील यांनी केले.
खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील करगणी येथील प्रचार दौऱ्यात केले.
करगणीत मुख्य रस्ता व पेठेतून वाद्याच्या गजरात पदयात्रा काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,वीर शिवा काशीद, राजेउमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. प्राचीन कालीन श्री.राम मंदिरात श्री रामाचे दर्शन घेतले.
पाटील पुढे म्हणाले की, करगणीची जनता या निवडणुकीत नक्कीच शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मला मतरुपी आशिर्वाद देतील याची मला खात्री आहे. जनतेने एकदा संधी द्यावी मागील 10 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून दूरदृष्टी असणारा आमदार असेल तर आमदार काय विकास करू शकतो हे मला संपूर्ण मतदारसंघाला दाखवायचे आहे. मी जे विटा शहरात केलं ते ते सर्व आटपाडीत करून आटपाडी एक सुंदर शहर करण्याचा मानस आहे. शैक्षणिक व औद्योगिक विकास करुन रोजगार निर्मिती करायची आहे. मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. विरोधकांना माझ्या वर टिका टिप्पणी करण्यासाठी कोणताच ठोस मुद्दा नसल्याने माझ्या शैक्षणिक संस्था वर टीका करीत आहेत. संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करून पुण्या मुंबईच्या तोडीचे शिक्षण विटा मध्ये देण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांनी शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात काय प्रगती केली याचे उत्तर द्यावे. आटपाडी तालुक्यात मोठ्या डाळिंब बाग आहेत. की ज्यातून दरवर्षी परकीय चलन मिळते. त्यासाठी आटपाडीत फलोत्पादनाला चालना म्हणून फळ प्रक्रिया व इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रकल्प आपल्या 35 वर्षाच्या कालखंडात करता आला नाही. आणि विकासाच्या बाण्या मारतात. जे जे आटपाडीत नाही ते ते मी करून दाखवणार आहे.त्यासाठी माझ्यावर मतरूपी आशीर्वादाचा वर्षाव करा. तुम्ही दिलेल्या मताशी प्रामाणिक राहून विकास काय असतो हे दाखवून देऊ.
यावेळी उमेश पाटील,अंकुश शेठ खिलारे,विजय शेठ सरगर,धनंजय सरगर,मेंजर उत्तम माने यांच्यासह जेष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.