झरेतील प्राध्यापक सेवा निवृतीचा लाभ मिळण्यासाठी बसणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार उपोषणाला……
१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार…. रामराज यादव यांचे
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता.आटपाडी येथील सेवा निवृत्त शिक्षक रामराज यशवंत यादव दिनांक 15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण ला बसणार असल्याबाबत प्रा .रामराजे यादव यांनी माहिती दिली आहे याबाबत त्यांनी विविध ठिकाणी निवेदने दिली आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, दि.१२/०६/१९९६ पासून महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, झरे ता. आटपाडी जि.सांगली येथे १००% अनुदानित शाखेमध्ये भौतिकशास्त्र विषयाचा पूर्ण वेळ, कायम उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते वयोमानानुसार यादव हे दि. ३१/०७/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
यादव बी.एस्सी. ला शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम व एम.एस्सी ला शिवाजी विद्यापीठात चतुर्थ अशी उच्चप्रतीची शैक्षणिक गुणवत्ता संपादित करून ते अत्यंत शिस्तप्रिय, वक्तशीर, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व स्वाभिमानी राहुन सेवा बजावली आहे.
शासकीय नियमानुसार त्यांचा निवृत्तीवेतन प्रस्ताव सेवानिवृत्ती दिनांकापुर्वी सहा महिने शासनास सादर व्हावा म्हणून यादव यांनी दि. ०३-०१-२०२४ रोजी प्राचार्य, जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, झरे यांना विनंती अर्ज केला होता.
सेवानिवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ यादव यांना वेळेत प्राप्त व्हावेत म्हणून त्यांनी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे, .शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व शिक्षणाधिकारी सो, जि.प. सांगली यांना विनंती अर्ज पाठवले आहेत.
तसेच प्राचार्य यांना दि. २२/०२/२०२४, दि.१६/०५/२०२४ व दि.२०/०५/२०२४ रोजी रजिस्टर पोस्टाने पाठवलेले विनंती अर्ज स्वीकारले नाहीत. शिक्षणाधिकारी सो (माध्यमिक), जि.प.सांगली यांचे दि.१३/०६/२०२४ च्या आदेशानंतरही प्राचार्य यांनी माझा निवृत्तीवेतन प्रस्ताव जाणीवपूर्वक अत्यंत विलंबाने दि. २६/०६/२०२४ रोजी . शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सांगली यांच्या कार्यालयात दाखल केला आहे. व भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायगी प्रस्ताव देखील जाणीवपूर्वक अत्यंत विलंबाने अधिक्षक सो, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, जि.प. सांगली यांचे कार्यालयात दाखल केला आहे.
तसेच यादव यांचे निवृत्ती वेतन अद्याप मंजूर झालेले नाही. तसेच उपदान, अंशराशीकरण, भविष्य निर्वाह निधी हे सेवानिवृत्तीचे आर्थिक लाभ आज अखेर त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत. निवृत्ती वेतन व सेवानिवृत्तीचे आर्थिक लाभ वेळेत न मिळाल्यामुळे माझी व माझ्या कुटुंबाची उपासमार होणार आहे .तसेच माझे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
पुढे अर्जात म्हंटले आहे की मला उच्च रक्तदाब, हृदय व मणक्याचा विकार आहे. माझ्या पत्नीस उच्च रक्तदाबाचा त्रास असून मेंदूतील रक्तत्रावामुळे तिला अर्धांगवायु झाला होता. सेवानिवृत्तीचे आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे औषधपाणी व वैद्यकीय उपचाराअभावी आमच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. माझ्या मुलीचे उच्च शिक्षण सुरू असून मुलगा सुशिक्षित बेरोजगार आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे माझ्या कुटुंबाची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे खालील मागण्यांसाठी दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.
माझ्या आमरण उपोषण काळात माझ्या जिवीताचे काही बरेवाईट झाल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य व जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, झरे यांचीच राहील असे निवेदनात म्हंटले आहे
चौकट:
सेवा निवृत शिक्षक रामराज यादव यांच्या प्रमुख मागण्या :
१) उपदान, अंशराशीकरण हे सेवानिवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ मला शासकीय नियमानुसार व्याजासह मिळावेत.
२) माझे निवृत्ती वेतन माझ्या बँक खात्यावर जमा होईपर्यंत माझ्या निवृत्तीवेतनाइतकी रक्कम दरमहा मला मा. प्राचार्य यांच्या वेतनातून मिळावी किंवा तोपर्यंत मा. प्राचार्य यांचे वेतन रोखण्यात यावे.
३) माझ्या न्यायहक्काच्या सेवानिवृत्तीच्या आर्थिक लाभास जाणीवपूर्वक विलंब करून कर्तव्यात कसूर केल्याबाबत . प्राचार्य यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी.