तऱ्हाडीत घाणीचे साम्राज्य, तक्रार करूनही कार्यवाही नाही
तऱ्हाडी:-येथील गृप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तऱ्हाडी गावात सांडपाणी गटारीचे काम बऱ्याच वर्षांपासून झाले आहे त्यामुळे गटारी ची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन त्यातून सांडपाणी चा निचरा होत नाही व रस्ता ओलाडण्यासाठी गटारीत टाकलेल्या पाईप मध्ये गाळ साचल्याने पाण्याचा पूर्ण पणे निचरा होत नसल्याने पाणी एका जागी साचते त्यामुळे गटारी जवळ पाण्याचे तळे निर्माण झालेले आहे त्या मुळे परीसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरीका़ंचे आरोग्य धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व गटारीचे पाणी घरात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती संपूर्ण गावात निर्माण झाली आहे .
गेल्या १३मार्च २०२४ पासून सरपंच चा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायत वर प्रशासक आर जी पावरा या़ची नियुक्ती झाली.प्रशासक गेल्या एक वर्षापासून कारभार करीत होते परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे सांडपाणी व्यवस्था वर लक्ष दिले नाही त्यांची बदली झाली त्या जागेवर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशासक सोनवणे व ग्रामविकास अधिकारी देविदास धाडे यांनी पण गावातील समस्या आहेत याकडे दुर्लक्ष केल्याने हि अवस्था झाली आहे .
एप्रिल महिन्याला सुरूवात झाली असुन तापमान ४२अंशावर पोहोचले अशी परिस्थिती आहे म्हणून गटराची अशी परिस्थिती राहिली तर डेंग्यू व मलेरीया होण्याची शक्यता आहे . जिल्हा परिषद धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी प़़ंचायत समिती शिरपूर यांनी लक्ष घालून तऱ्हाडी गावातील ग्रामपंचायत सांडपाणी गटारीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे


