अमरापूर तोंडोली उपाळेमायणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
तोंडोलीत बाजार पटांगणातील खड्ड्यात ग्रामस्थांनी केले वृक्षारोपण.
तोंडोली (ता.कडेगाव)येथील बाजार पटांगणात रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करताना दक्ष नागरिक (छाया:शिवाजी मोहिते तोंडोली)
कडेगाव प्रतिनिधी
अमरापुर तोंडोली उपळे मायणी या डांबरी रस्त्यावर डांबर निसटल्याने खडी रस्ता खचला असून ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत तर पावसाळ्या अगोदर पडलेल्या खड्ड्यात कोणते ही पॅचवर्क न केल्याने काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालं असून केलेला डांबरी रस्ता उकडून गेलेला आहे.
अमरापुर तोंडोली उपाळे मायणी गावातील दक्ष नागरिकांनी याबाबत वारंवार तोंडी-लेखी तक्रार करून सुद्धा यावर कोणते ही पॅचवर्क अगर तात्पुरती मलमपट्टी न केल्याने त्रस्त नागरिकांनी मंगळवार रोजी तोंडोली येथील बाजार पटांगणातील मोठमोठ्या खड्ड्यात बेशरमचे वृक्षारोपण करून प्रशासकीय यंत्रणेचा व संबंधित अधिकारी आणि शासनाचा जाहीर निषेध केला.
बाजार पटांगणातील डांबरी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपणात सिताफळ,करंज,गुळभेंडी, वृक्षारोपण करून आज आम्ही संबंधित प्रशासकीय अधिकारी,शासनाचा व प्रशासकीय यंत्रणेचा निषेध केला आहे जर पॅचवर्ग झालं नाही तर आंदोलन करणार आहोत अशी त्रस्त ग्रामस्थांनी माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे समीर मुलानी, महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे,अर्जुन मोहिते, केशव मोहिते, शिवाजी मोहिते, संदीप मोहिते,वसंत मोहिते,वसंत महापुरे यांचेसह तोंडोली,अमरापुर,उपळेमायणी परिसरातील दक्ष नागरिक उपस्थित होते.