स्व. माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मृतिदिनी कवीसंमेलन
कुकु ड प्रतिनिधी : जयराम शिंदे
तालुक्याचे माजी आमदार घोंडीराम वाघमारे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त वडजल येथे २८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नामवंत कवींचे संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
संमेलनाचे निमंत्रक अभय वाघमारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे की माणसारख्यादुष्काळीतालुक्यातून मुंबईला जाऊन शिक्षण घेतलेल्या
आणि पुढे डॉ. आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन चळवळीत उतरलेल्या आणि नजीकच्याच काळात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रभावातून पक्षीय राजकारणाकडे ओढल्या गेलेल्या दिवंगत वाघमारे यांनी सलग दहा वर्ष या तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. पाण्यापासून ते दळणवळणापर्यंतचे महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचे श्रेय निश्चितपणे त्यांना जाते. विद्यार्थीदशेपासून आंबेडकर चळवळीच्या संस्कारांमुळे ते
साहित्य चळवळीशी जोडले गेले. यातूनच त्यांनी प्रस्थापित समचे व्यवस्थांविरुद्धचा आपला संताप कवितेद्वारे व्यक्त केला. परिणामस्वरूप त्यांचा हुंदका हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. अशा या साहित्य प्रेमी लोकप्रतिनिधीचा दहावा स्मृतिदिन कवी संमेलनाने साजरा होण्यात विशेष औचित्य आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष, माजी आमदार रामदास फुटाणे असतील. त्यांच्याच
अध्यक्षतेखाली होणाऱ्या या हास्यधारा संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे, विठ्ठल वाघ, विजय चोरमारे, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर, प्रशांत मोरे, भरत दौंडकर, लता एवळे, रमजान मुल्ला आदि महाराष्ट्रभरातील नामवंत कवी काव्यरचना सादर करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समाधीस्थळ परिसरात होणाऱ्या या संमेलनास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे.