• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

170 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश…..चेतना इलपाते, नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल……एकच जमीन अनेकांना विक्रीचे आमिष, कोट्यवधींची फसवणूक उघड…..

माणगंगा by माणगंगा
January 22, 2025
in Uncategorized
0
170 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश…..चेतना इलपाते, नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल……एकच जमीन अनेकांना विक्रीचे आमिष, कोट्यवधींची फसवणूक उघड…..

170 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

चेतना इलपाते, नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एकच जमीन अनेकांना विक्रीचे आमिष, कोट्यवधींची फसवणूक उघड

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबई: खोटे आदिवासी दाखले, आधार कार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून सुमारे १०७ एकर आदिवासींच्या जमिनींची परस्पर विक्री करण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत नुकताच झाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या टीमला मिळालेली आहे.

स्वतः आदिवासी असल्याचे भासवून आदिवासी जमिनी बळकावून त्या विक्री करणाऱ्या चेतना ईलपाते व तिचे सहकारी अमर खुराणा, जीतेन्द्र पुरी, तसेच शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असणाऱ्या नरसी मोनजी ट्रस्ट (Narsee Monjee Institute of Management Studies -NMIMS) व त्याचे पदाधिकारी शैलेश गाजीवाला (Shailesh Gajiwala), हितेन शहा (Hiten Shah) व अशोक मुंढे (Ashok Mundhe) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रमसिंह पाटणकर यांच्या विक्रमेश इस्टेट एलएलपी कंपनीने केलेल्या एफआयआर मधील नोंदीनुसार असे स्पष्ट होते की, निंबोडे (ता. खालापूर ) येथील १०७ एकर जमीन ही मूळ आदिवासी जमीन आहे. ती जमीन विक्री करण्यासाठी सानपाडा येथील विक्रमेश इस्टेट एलएलपीसोबत चेतना इलपाते व त्यांचे सहकारी अमर खुराणा व जितेंद्र पुरी यांनी करार केला होता. तसेच दोन कोटी रुपयांची ऍडव्हान्स रक्कम सुद्धा घेतली होती. आदिवासी जमीन हस्तांतरित करून देण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकती, जमिनीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे चेतना इलपाते यांनी आधीच आश्वासन दिले होते.

खरेदीस टाळाटाळ
पण खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत फक्त पैशाची मागणी त्या करत होत्या. त्याची टाळाटाळ लक्षात आल्यानंतर कंपनीने खरेदीखतासाठी आग्रह धरला. तसेच त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. तेव्हा आपल्यावर कारवाई होऊन आदिवासी जमीन परत मूळ मालकांना परत जाण्याच्या भीतीने चेतना इलपाते यांनी ही जमीन नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट एज्युकेशन ट्रस्ट यांना विक्री केल्याचे भासवण्याचे नवे कारस्थान रचले. या कटात ट्रस्टचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले.

ट्रस्टच्या खरेदी व्यवहाराला हरकत
ट्रस्टने खरेदीसाठी दिलेल्या वृत्तपत्र जाहिरातीवरून विक्रमेश इस्टेट कंपनीतर्फे हरकत नोंद केली होती. तसेच ट्रस्टला आपल्या व्यवहाराची कल्पना सुद्धा कंपनीने दस्त्वेजासह करून दिली होती. पण हरकत डावलून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी चेतना इलपाते व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत १२/४/२०२४ व १०-७-२०२४ रोजी खरेदी करार पूर्ण केले. असा व्यवहार करून जमीन खरेदी केल्याचे भासवले आहे.

अनेकांची फसवणुक
चेतना Chetna Ilpate) आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या दस्तावेजांची पडताळणी कंपनीने केली असता त्यांनी बनावट दस्तावेज बनवून अनेक लोकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले. एकच जमीन अनेकांना विकण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे उघडकीस आले. त्यामुळे विक्रमेश इस्टेट एलएलपीचे संस्थापक विक्रमसिंह पाटणकर यांनी खालापूर पोलिसात चेतना इलपाते तिचे सहकारी, तसेच नरसी मोनजी ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश पटेल अमरीश पटेल (Amrish Patel) व संचालक बुरझिन भथेना (Burzeen Bhathena) यांना वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अनेक प्रकरणांचा उलगडा होणार
या रॅकेटने केलेल्या फसवणुकीच्या अनेक घटना आता उघडकीस येत आहेत. अद्याप अनेक प्रकरणांचा उलगडा व्हायचा आहे. पोलिसांची तपासचक्रे त्या दिशेने सुरू केली आहेत.

अन्य शहरांतही तक्रारी
गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील एका बिल्डरला दोन कोटी रुपयांना फसवल्याबाबत चेतना ईलपाते व त्यांचे सहकाऱ्यांवर एक गुन्हा दाखल झाला आहे. चेतना यांनी खोटे आदिवासी प्रमाणपत्रे धारण केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. अन्य शहरातसुद्धा त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल होत आहेत. कलकत्तामध्ये सुद्धा एक असाच गुन्हा दाखल झाल्याचे स्प्राऊटच्या निदर्शनास आले आहे.

“ट्रस्टचे पदाधिकारीही रॅकेटमध्ये
आम्ही केलेल्या व्यवहाराची माहिती असूनसुद्धा नरसी मोनजी ट्रस्टचे पदाधिकारी चेतना इलपाते व त्यांच्या साथीदारांच्या कटकारस्थानात सहभागी झाले. खरेदीचे दस्तावेज बनवले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या अशा नामवंत संस्थेने जमिनी लाटण्याचा प्रकार गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने निंदनीय आहे म्हणूनच ते कारवाईस पात्र आहेत.” असे विक्रमसिंह पाटणकर – संस्थापक, विक्रमेश इस्टेट एलएलपी यांनी सांगितले.

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 88
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)