एम आय डी सी मंजूर करा _मनसे नेते राजेश जाधव
जागा सुचवतो एम आय डी सी द्या.
_मनसे नेते राजेश जाधव.
तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि आटपाडी तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी येण्यासाठी एम आय डी सी ची निर्मिती होणें अत्यंत आवश्यक आहे.
दिवंगत आ.अनिलभाऊ बाबर यांच्या विटा येथे जन्मदिनाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्यात, अनिलभाऊंच्या मागणीनुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यासपीठावरून आटपाडीत नवीन MIDC ला तत्वतः मान्यता देत असल्याची घोषणा केली होती , यासाठी लागणारी जमीन निश्चित करा ,आचारसंहितें पूर्वी एम आय डी सी मंजूर करण्याचे जाहीर केले होतें .
येत्या विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्याआधी आटपाडी तालुक्याच्या विकासाचा माईल स्टोन ठरणाऱ्या एम.आय.डी.सी. चा ठोस निर्णय व्हावा ही मागणी मनसेचे सांगली जिल्हा सचिव राजेश जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत याना केली आहे.
आटपाडी तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(MIDC)करिता जागा सुचवा एम आय डी सी देतो असे उद्योग मंत्री बोलले होते आता मनसे नेत्याकडून जागा सुचवतो एम आय डी सी मंजूर करा अशा भूमिकेचे पत्र , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांना देण्यात आले.
मुंबईत राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा मनसेचा पार पडला त्यात राज ठाकरेंनी राज्यात अडीचशे जागा लढवण्याची तयारी करण्याचें आदेश दिल्यानंतर मतदारसंघात मनसेच्या हालचालींना एम आय डी सी च्या निमित्ताने गती आल्याचे दिसतें . नुकताच सांगली जिल्ह्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विधानसभा निवडणुकी संदर्भात बैठक झाली ,त्यात मनसेचे निरीक्षक जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे राजेश जाधव यांनी सांगितले .
यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सत्यवान पिंजारी, म.न.शेतकरी सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष प्रकाश गायकवाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.