ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा ; प्रफुल्ल पाटील यांनी केले आवाहन
त-हाडी प्रतिनिधी –
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील व तालुक्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त-हाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रफुल्ल पाटील याच्याकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र १ व २, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेत राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना सुस्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरीक असमथतता, दुबर्लतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर आदीचा समावेश आहे. मनस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रूपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा. तसेच नोंदणीची पावती आवश्यक आहे. आध- ारकार्ड नसल्यास आणि स्वतंत्र दस्ताऐवज असल्यास ते ओळख पटविण्यासाठी पुरेसे असणार आहे. लाभाच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रूपयांच्या आत असावे. याबाबत लाभाथ्यनि स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
मागील ३ वर्षाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केलेले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरीत झाल्यावर विहित केलेली उपकरण खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत पोर्टलवर अपलोड करणे आवयक राहणार असल्याची माहिती हि प्रफुल्ल पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.