कोंढावळ येथे
शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी यांनी स्विकारले.
कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन मोहिनी माळी व गुणवंती माळी या विद्यार्थिनींनी केले.तसेच सांस्कृतिक समिती अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी आपल्या मनोगतात
पाच सप्टेंबर हा भारतभर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्ताने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो पण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो प्रत्येक मग तो लहान असो का मोठा काहीतरी चांगले घेण्याच्या शिकवण्याच्या प्रयत्न करीत असतो आयुष्याला आकार आणि आधार ज्ञान देणाऱ्या प्रत्येक वळणावर ज्यांनी जीवनात यशाची बेरीज आणि दुःखाची वजाबाकी शिकवली तसेच अपयशाला भागाकार देऊन आनंदाचा गुणाकार समजावून दिला अनेकांना घडवलं.
तसेच गोरख वाल्हे व कैलास सैदाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अशा गुरुजनांचा ऋण फेडण्यासाठी अल्पशा सन्मान शिक्षक दिनी कोंढावळ येथील इ .पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेन भेट देऊन गुरुजनांचा गौरव सन्मान केला.तसेच इ .दहावीच्या विद्यार्थ्यांनी गायत्री सोनवणे, साक्षी माळी,तेजस्विनी माळी,महिमा माळी,राधिका माळी, प्राजक्ता माळी, पदमिनी माळी, दिव्या माळी,गायत्री गंगावणे,प्रतीक्षा माळी यांनी शिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला.व शिपाई म्हणून रोहित माळी,केदार माळी यांनी भूमिका बजावली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक धनराज जगताप,रोहिदास खैरनार,योगेश शिंपी,सुलोचना सोनवणे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल,स्वप्नील बैसाने यांनी प्रयत्न केले.