जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
गणित विषयाचे जादूगार श्री.सुजित वाळके सर यांचे मार्गदर्शन सत्र रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जात आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी म्हणून गणित विषयाचे जादूगार असे ज्यांना संबोधलं जातं असे श्री.सुजित वाळके सर यांचे विशेष सत्र शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित केले होते.. रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करावा आणि त्यामधील गणित हा विषय त्यांना सोपा जावा तसेच गणिताची भीती मनातून दूर व्हावी आणि मग त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मोठे यश संपादन करावं या उद्दिष्टासाठी गणिताचे विशेष मार्गदर्शन कार्यशाळा रत्नागिरी तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केली जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दि मॉडेल इंग्लिश स्कुल, न्यू इंग्लिश स्कूल व न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल या तीन शाळांमधील विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते. विद्यार्थी वर्गाला निश्चित याचा चांगला उपयोग होणार झाला.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.सर्व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले. श्री सुजीत वाळके यांचा या प्रसंगी मुख्याध्यापक अंतुले सर यांनी शाल व गुलाबपुष्प देवून सत्कार केला. याप्रसंगी श्री नितीन बैकर,श्री गंधेरे सर,श्री चव्हाण सर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.