” ४० हजार ५१ शेतकरी अर्थसहाय्य योजनेत पात्र.”
शिरपूर : सन २०२३ मध्ये ई पिक पाहणी नोदणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक पात्र शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजाराचा लाभ.
महेंद्र खोंडे
त-हाडी : – शिरपूर तालुक्यात २०२३ या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची लागवड करून ई – पिक पाहणी केलेल्या सुमारे ४० हजार ५१ शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी किमान १०००/- रू ते जास्तीत जास्त पिकास २ हेक्टर पर्यंत १० हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावात लावल्या जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना किमान ०.२० हे साठी १ हजार रुपये आणि जास्तीत जास्त २ हेक्टर सोयाबीन किंवा कापुस पिकासाठी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देय करण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ स्वयंम साक्षांकित आधार कार्डची झेरॉक्स देऊन गावातील कृषी मित्राकडे विहित नमुन्यातील फॉर्मवर परिपूर्ण माहिती भरून आपले नाव व सही करून देणे गरजेचे असणार आहे.
शिरपूर तालुक्यात २०२३ या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन व मका पिकाची लागवड केली होती. परंतु मागील वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. खरीप हंगामात २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन पीक लागवड करून त्याची ई – पिक पाहणी ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अर्थसहाय्य योजनेतून प्रति हेक्टरी पाच हजार रुपय प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची नुकतीच दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अर्थसहाय्य योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सोमवारी १२ ऑगस्ट पासून प्रत्येक गावात कृषी सहाय्यक व कृषी मित्राच्या माध्यमातून या योजनेची यादी गावात लावली जाणार आहे. तसेच यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी फॉर्मही उपलब्ध करून दिला जाणार आहे. गावात लावलेल्या यादीत आपले नाव असल्यास शेतकऱ्यांनी केवळ आधार कार्डची झेरॉक्स व उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मवर लाभार्थी शेतकऱ्याचे नाव, कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र व सही करून द्यावी लागणार आहे. या योजनेत तालुक्यातील ४० हजार ५१ शेतकरी पात्र आहे.
…..
- विना खर्च शेतकऱ्यांना मिळणार मोबदला •
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांचा कुठलाही खर्च होणार नाही याची काळजी या योजनेत शासनाने घेतली आहे. गावात लावलेल्या यादीत नाव असल्यास केवळ आधार कार्डची झेरॉक्स व शासनाने निर्धारित केलेले संमती पत्र शेतकऱ्यांनी भरून कृषी सहाय्यक किंवा गावातील कृषी मित्राकडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे यात कुठलाही खर्च शेतकऱ्यांचा होणार नाही.
चौकट;
“सन २०२३ मध्ये ई पिक पाहणी नोदणी केलेले सानुग्रह अनुदानसाठी पिक निहाय पात्र लाभार्थी संख्या.”
- कापूस पीक (२०२३) •
- संयुक्त खातेदार शेतकरी : ८८३२
- वैयक्तिक खातेदार शेतकरी :३०१४१
- एकूण कापूस उत्पादक पात्र लाभार्थी शेतकरी :३८९७३
…. - सोयाबीन पीक (२०२३) •
- संयुक्त खातेदार शेतकरी : -३२०
- वैयक्तिक खातेदार लाभार्थी शेतकरी : ७५८
- एकूण सोयाबीन उत्पादक पात्र लाभार्थी शेतकरी : १०७८
…. - अर्थसहाय योजनेतील पात्र एकूण लाभार्थी शेतकरी :४००५१
प्रतिक्रिया ;
सदर योजनेचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत सीएससी केंद्रावरून ऑनलाईन पद्धतीने भरू नये, किंवा कुणाला यासाठी काही फी अदा करू नये. शेतकऱ्यांनी यासाठी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक,कृषी मित्र यांना संपर्क करून आपला अर्ज त्यांच्याकडे आपआपल्या गावात देऊन सहकार्य करावे. तसेच सर्व शिरपूर तालुक्यातील सरपंच महोदयांना विनंती की, आपण देखील आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संकलन मध्ये कृषी सहाय्यक यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
- संजय पवार, तालुका कृषी अधिकारी, शिरपूर
चौकट;
- जास्तीत जास्त दोन हेक्टर पावतो च्या मर्यादित अनुदान •
ज्या शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची लागवड करून ई – पिक नोंदणी केली. त्या पीक नोंदणी मध्ये जेवढे क्षेत्र शेतकऱ्यांनी टाकले त्या पैकी जास्तीत जास्त २ हेक्टर पावेतोच्या मर्यादित सहानुग्र अनुदान शेतकऱ्यांना या योजनेतून मिळणार आहे. एका हेक्टर पर्यंत पाच हजार रुपये यात एक हेक्टर पेक्षा कमी ०.२० हे .क्षेत्र असल्यास किमान १ हजार रु. रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
…..
….. फोटो –
मौजे असली येथे सन २०२३ मध्ये ई पिक पाहणी नोदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी चे वाचन करून सदर यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात आली. त्याप्रसंगी सरपंच श्रीमती सरला बाई धनगर,कृषी सहाय्यक रोहिणी वळवी, ग्रामसेवक गीतांजली पाटील व शेतकरी.