ई-पीक पाहणीची अट रद्द करा, सरसकट अनुदान द्या; भुषण बागुल यांची मागणी
शिरपूर तालुक्यात परिसरात बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित
शिरपूर प्रतिनिधी –
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात बरेचसे शेतकरी पिक विमा कंपनीने काही कारण नसताना अपात्र ठरविण्यात आले आहे.यासाठी शिरपूर कृषी विभागाला भुषण बागुल यांच्या वतीने मागणी केली आहे.सन-२०२३अनुदानासाठी ई-पिक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रद्द करून सरसगट शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत करण्यात यावी असा सूर शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मंगळवारपासून उमटत आहे. या मागणीसाठी भुषण बागुल वतीने शिरपूर कृषी विभागाला व शिरपूर तहसीलदार यांच्या कडे करण्यात येणार आहे आहे.
की, खरीप हंगाम सन २०२३ मध्ये शिरपूर तालुक्यात बुतांश भागात कमी पाऊस झाल्याने तसेच सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, त्यानुषंगाने झालेल्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परंतू सदर निर्णयात शासनाने ई-पिक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास खरीप पात्र रहाणार असल्याची जाचक अट घातली आहे. यामुळे शिरपूर तालुक्यातील १४ हजारांवर शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
वंचित असलेले शेतकरी यांची तातडीने यादीत घ्यावे अंशी मागणी भुषण बागुल यांनी केली आहे.शिरपुरसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. सदर ठिकाणी नेटवर्क नसल्याने तसेच पोर्टलचे सर्व्हर सतत डाऊन असल्याने जवळपास ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांची ई- पिक पाहणी झालेली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केलेली आहे, त्यामधील १० टक्के शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट झालेली नसल्याचे भुषण बागुल यांच्या निदर्शनास आले आहे.यामुळे शेतकऱ्यांत रोष दिसत आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहता ई- पिक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रद्द करून सरसगट शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत द्यावी अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा कडक इशारा भुषण बागुल यांनी दिला आहे.कापूस, सोयाबिन उत्पादकांना मिळणारे अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे पात्र लाभार्थी मिळणार लाभ शेतक-यांच्या याद्या शासनाने ग्रामपंचायतीला पाठविल्या आहेत. हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणे अधिकतम २ हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक खातेदार सर्वांना व सामूहिक खातेदारांतील फक्त एका व्यक्तीला या अनुदानाचा लाभ मिळेल. वैयक्तिक खातेदारासाठी आधार कार्डची स्वतः स्वाक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत, संमती पत्र आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर सदर अनुदान १९ ऑगस्टपर्यंत टाकण्याचे प्रयोजन सुरू झाले आहे