बनपुरीत आम. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सभागृहासाठी दहा लाखाचा निधी —
सरपंच सुनीता पाटील
बनपुरी ता. आटपाडी येथे रामोशी समाजासाठी सभागृह नसल्याने रामोशी समाजांना सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी कोणतेही सभागृह नव्हते ,या समाजाची अडचण दूर करण्यासाठी सरपंच सुनीता पाटील व युवा नेते महादेव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली होती
त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून रामोशी समाजाच्या सभागृहासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे, या सभागृहाचा बांधकामाचा शुभारंभ लवकरच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते व सरपंच सुनीता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याची माहिती युवा नेते महादेव पाटील यांनी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून यापूर्वी अनेक घटकांच्या विकासासाठी निधी दिला आहे .परंतु रामोशी समाजाचा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी किंवा या समाजाला एकत्रित विचार विनिमय करण्यासाठी कोणतेही सभागृह नव्हते. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या समाजाचा विचार करून त्यांच्या सभागृहासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने रामोशी समाजातून आम गोपीचंद पदळकरांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे







