लिंगीवरेत पांडुरंग जावीर यांचा शॉक लागून मृत्यू
आटपाडी प्रतिनिधी
लिंगीवरे ता. आटपाडी येथील पांडुरंग अण्णा जावीर वय वर्ष 55 यांना इलेक्ट्रिक शॉक लागून यांचा मृत्यू झाला आहे.
पांडुरंग जावीर हे पाणी मारत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे दाखल करण्यात आले होते पुढील तपास पो. ना. दाईगंडे करीत आहेत