• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आत्ता सातवी पास असाल तरच सरपंच होता येणार; शिंदे-फडणवीस सरकारचा नवा आदेश

माणगंगा by माणगंगा
November 30, 2022
in मुंबई
0
आत्ता सातवी पास असाल तरच सरपंच होता येणार; शिंदे-फडणवीस सरकारचा नवा आदेश

आत्ता सातवी पास असाल तरच सरपंच होता येणार; शिंदे-फडणवीस सरकारचा नवा आदेश

राज्यातील सरपंचपदासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता सातवी पास असणं आवश्यक असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे.

सन १९९५ नंतर जन्म झालेल्या उमेदवारांसाठी हा नियम लागू असल्याचा निर्णय ग्रामविकास खात्यानं घेतला असून त्याबाबतचं एक पत्रही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी करण्यात आलं आहे.

कोरोना महामारीमुळं राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळं आता निवडणुकीच्या आधी सरपंचपदासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी, याबाबतची माहिती राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे मागितली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं नवा नियम जारी केला आहे.

राज्यातील सरपंचपदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा जन्म १९९५ नंतर झाला असेल तर त्यांना सातवी पास असणं आवश्यक आहे. त्यामुळं आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हा नियम जारी करण्यात आला आहे. सरपंचपदा शिवाय ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळं आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत महाराष्ट्र सरकारनं नवा नियम लागू केल्यानं अनेक राजकीय नेत्यांच्या समर्थकांना धक्का बसणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारच्या काळात थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारनं स्थगिती दिली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा तो निर्णय लागू केला.

त्यामुळं आता राज्यात जितक्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यातच आता सरपंचपदासाठीची शैक्षणिक पात्रतेचा नियमही बदलण्यात आल्यानं जास्तीत जास्त युवकांना राजकारणात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Views: 205
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ७४ अर्ज दाखल

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ७४ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)