आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ७४ अर्ज दाखल
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. आजअखेर तीन दिवसात सरपंच पदासाठी २८ व सदस्य पदासाठी ७४ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.
पहिल्या दिवशी दि.२८ रोजी सरपंच पदासाठी तीन व सदस्य पदासाठी एक, कालच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ रोजी सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी १५ तर आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.







