मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर अमोल वंजारे यांची सर्वानुमते नियुक्ती. .!
मुंबई (प्रतिनिधी – लालबाग-परळ राहुल खरात)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने, युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी आमदार व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू दादा सपकाळ, शिवसेना उपनेते व विधान परिषद आमदार सचिन भाऊ अहिर, व शिवसेना उपनेत्या सौ.मीनाताई कांबळी यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्ष सौ.शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.श्री.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र समन्वयक जितेन्द्र दगडू दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक श्री.अमोल वंजारे यांच्या रुग्णसेवेची व सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेऊन शिव आरोग्य सेनेत मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल मुंबईतून तसेच समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.







