• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

माणगंगा by माणगंगा
December 3, 2022
in मुंबई
0
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ आज/शनिवारी करण्यात आला. या विकासकामांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात शहराचे रूप पुरते पालटलेले दिसेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

ठाणे शहरापासून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली, त्यामुळे हे शहर एक सुंदर आणि सुनियोजित शहर व्हावे हे माझे स्वप्न आहे, असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या माध्यमातून याकरिता ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला असून त्या माध्यमातून शहरातील चौकांचे सुशोभीकरण, पुलांची रंगरंगोटी आणि विद्युतीकरण, रस्ते, फूटपाथ यांची डागडुजी आणि सुशोभीकरण, शहर खड्डेमुक्त तसेच सुंदर करण्याचे काम करण्यात येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शहरातील डेब्रिज हटवणे, मंडई परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालयांची नियमित डागडुजी व स्वच्छता ठेवत तिथे केअर टेकर तैनात करणे आदी बाबींना प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

शहरामध्ये प्रस्तावित असलेली विकासकामे दर्जेदार व्हायला हवीत तसेच ती करताना ठाणेकर नागरिकांनी देखील आपले शहर सुंदर ठेवण्यासाठी शक्य ते सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ठाणे महानगरपालिकेत आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान केला.

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, ठाणेमहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, माजी महापौर सौ.मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी विरोधी पक्षनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक नारायण पवार, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, ठाणे महानगरपालिकेतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 270
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत

जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)