• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार -आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

माणगंगा by माणगंगा
December 30, 2022
in मुंबई
0
संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या   मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार -आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या
मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नागपूर – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश दिले जातात. मात्र संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही. ही फेरी प्रवेश प्रक्रियेचा भाग असतानाही या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ नाकारला जातो. हा मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शासनाने ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. त्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी घोषणा केली.

यावेळी सभागृहात तारांकित प्रश्नावर बोलताना आ. दरेकर म्हणाले की, खाजगी विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांनी संस्था स्तरावरील फेरीत प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनाकडून नाकारला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मागील वर्षी एक परिपत्रक जाहीर करून संस्था स्तरावर होणाऱ्या प्रवेशाचे अर्ज शिष्यवृत्तीसाठी पाठविण्यात येऊ नये असे आदेश निर्गमित केले होते. त्यामुळे शेवटच्या फेरीत रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीसाठी पात्र असतानाही शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पुर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे घ्यावे लागत आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असणारी शेवटची प्रवेश फेरी अगेन्स द कॅप राऊंड ही असते. ही फेरी प्रवेश प्रक्रियेचा भाग असतानाही या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ नाकारल्याने मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अखेरच्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ. दरेकर यांनी केली.

त्यावर सकारात्मक उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कॅप राऊंडमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणजे तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नाही, असा एक समज होता. मात्र यापुढे असे न करता संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल केला जाईल.

Views: 182
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बचेरी गावात भव्य दिव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा, चेअरमन चषकचा कोण होणार माणकरी?

बचेरी गावात भव्य दिव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा, चेअरमन चषकचा कोण होणार माणकरी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)