बचेरी गावात भव्य दिव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा, चेअरमन चषकचा कोण होणार माणकरी?
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सदगुरू श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे चेअरमन शेषागिरी राव अंकल यांच्या 6 जानेवारी वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील लोखंडे मैदानात शनिवार दिनांक 31/11/2022 रोजी भव्य दिव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आयोजक पत्रकार विश्वजीत गोरड, गणेश हांडे, मल्हारी चव्हाण, सुनिल माने , महेश माने यांनी सांगितले.
प्रथम क्रमाकांचे बक्षीस 1111/- व चेअरमन चषक राजेवाडीचे युवा नेते व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे अत्यंत विश्वासु शिलेदार राहुल भैय्या पुजारी यांनी दिले असुन द्वितीय बक्षीस 7777/-धुळोबा स्लायडींग बचेरी चे मालक परमेश्वर शिंदे ,तृतीय क्रमांकाचे बक्षीस 5555/- सभांजीनगर ग्रामपंचायत सातारा चे उपसरपंच काशिनाथ गोरड,चतुर्थ 3333/-क्रमांकाचे बक्षीस लोकनेते उत्तमरावजी जाणकर साहेब यांचे खंदे समर्थक बिराभाई शिंदे यांनी दिले असुन सदर सामन्यांसाठी चैतन्य पशुहार व मका केंद्राचे मालक तुषार राऊत यांनी ट्राॅफी तर युवा नेते अनंता कपने यांनी बाॅल व स्टंप दिले असल्याची माहीती राजधानी करियर अकैडमी चे संचालक शक्तीमान बरकडे सर यांनी मिडीयाशी बोलताना दिली सदर कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी संभाजी तात्या शिंदे,गोविंद नाना शिंदे , माजी डेप्युटी सरपंच सुदाम बापु शिंदे,पै रामभाऊ गोरड,नारायण बापु शिंदे,सुनिल बरकडे,बिरुदेव शिंदे, भावी सरपंच जयवंतराव भिसे ,माजी उपसरपंच नारायण बापु शिंदे,प्रा शंकर शिंदे सर प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत.
तरी आसपासच्या भागातील जास्तीत जास्त संंघानी सहभाग नोंदवावा असं अवाहन बचेरी गावचे आदर्श सरपंच महादेव पाटील व उपसरपंच मोहन दादा शिकारे यांनी केले आहे







