शिरपूर सकल जैन समाज : तहसीलदारांना देणार निवेदन
पर्यटन स्थळ घोषीत केल्याने ; सम्मेद शिखरजी ; शिरपूर सकल जैन समाजाचा ४ जानेवारी ला मुक मोर्चा
शिरपूर : शहरातील सकल जैन समाजाची महत्त्व पूर्ण बैठक ३० रोजी जैन उपाश्रयात समाजातील प्रमुखांच्या उपस्थीती पार पडली यादरम्यान झारखंड सरकार कडून सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आल्या नंतर देशभरातून जैन समाजाकडून विरोध वाढत चालला आहे याकारणाने झारखंड सरकार कडून हा निर्णय मागे घेण्यासाठी शिरपूर च्या सकल जैन समाजाकडून बुधवार ४ जानेवारी रोजी शिरपूर तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे या मुक मोर्च्यात सकल जैन बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन समाजातील प्रमुखांनी केले आहे
मुक मोर्चा चा मार्ग
सकाळी ९ वाजता : जैन गल्ली पासून मुक मोर्चास प्रारंभ
काॅंग्रेस भवन
विजय स्तंभ
तारण तरण जैन चैत्यालय
अंबिका नगर
नुतन जैन स्थानक मार्गाने
तहसील कार्यालय
मुक मोर्चा चा समारोप







