मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक २०२३ करिता ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहून ठाणे जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक २०२३ करिता ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणे जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती सरकारच्या समाजातील सर्व घटकांकरिता घेण्यात आलेले निर्णय तसेच योजना मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून शिक्षकांवरील शाळाबाह्य कामांचे ओझे कमी करून त्यांच्याकडून केवळ विद्यादानाचेच काम करून घेतले जावे यासाठी नक्की प्रयत्न करू असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, किसन कथोरे, निरंजन डावखरे, डॉ.बालाजी किणीकर, शरद सोनावणे, महेश चौघुले, माजी खासदार संजीव नाईक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, उपनेते प्रकाश पाटील, महिला जिल्हा संघटक सौ.मीनाक्षी शिंदे, संदीप लेले, विजय चौघुले तसेच बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.







