पुसद तालुका कॉंग्रेस सोशल मीडिया कमिटीत अब्दुल रहेमान चव्हाण यांची तालुकाध्यक्ष पदी निवड ;
नियुक्ति पत्र देतांना महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते….
पुसद :- पुसद तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी च्या सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी अब्दुल रहेमान चव्हाण यांची महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व विशेष उपस्थितीत सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ति पत्र देवून निवड करण्यात आली आहे.
या वेळी वक्फ बोर्ड अध्यक्ष आ.डॉ.वजाहत मिर्झा , पुसद नप चे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम , यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रफुल मानकर , सचिन नाईक , यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे महासचिव सैय्यद इश्तियाक , पुसद शहर कॉंग्रेस कमिटी चे शहराध्य्क्ष शेख जिया व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…







