मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
संभाजी नगर: ५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरंकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली. महाड चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या वेळीही मला निरंकारी मिशनचे कार्यकर्ते मंडळी अखंड सेवा करताना दिसले. माझ्या ठाणे मतदारसंघात देखील निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दलही निरांकरी मिशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.







