सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून आई भराडी देवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास उपस्थित राहून आई भराडीदेवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले.
कोकणातील माणसाचे आराध्य दैवत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेत सहभागी होऊन देवीचे मनोभावे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले. देश आणि राज्यावर अरिष्टाचे सावटही येऊ नये, राज्यातील बळीराजाला समृद्ध कर, सर्वसामान्यांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी आई भराडी देवीच्या चरणी केली.
याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून आई भराडी देवीच्या दर्शनासाठी बहुसंख्येने जमलेल्या भक्तगणांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वार्थाने प्रयत्नशील असून त्यासाठी कोकण नियोजन प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई सागरी मार्गाचे काम देखील लवकरच हाती घेऊन कोकणातील नागरिकांना दिलासा देऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यासमयी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आई भराडी देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.