• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी “माझे घर, माझी जमीन अभियान” या जनचळवळीची मुहूर्तमेढ

माणगंगा by माणगंगा
February 22, 2023
in मुंबई
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी “माझे घर, माझी जमीन अभियान” या जनचळवळीची मुहूर्तमेढ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी “माझे घर, माझी जमीन अभियान” या जनचळवळीची मुहूर्तमेढ

“माझं घर, माझी जमीन अभियान करीता” आप पक्षाचे मुंबई प्रभारी धनंजय रामकृष्ण शिंदे यांचे आवाहन

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ जयंती दिनी, रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी “माझे घर, माझी जमीन अभियान” या घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या समविचारी लोकांच्या जनचळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. वडाळा वेलफ़ेयर संक्रमण शिबीर क्र. १ व २ येथील हजारो रहिवाशांच्या घराच्या प्रश्नासंबंधी आयोजित बैठकीत “माझे घर, माझी जमीन अभियान” च्या सभेत अनेक नागरिकांनी आपल्या विविध अडचणी व भूमिका मांडली. या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. छत्रपतींना घडवणारी माता जिजाऊ आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी माता सावित्री बाई फुले यांच्या लेकी एकत्र येऊन आपल्या घरांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभे करत आहेत हि अत्यंत अभिमानाची बाब आहे.

ज्या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो ती आंदोलने यशस्वी झाल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती, धर्म व पंथाच्या लोकांना एकत्र येऊन रयतेचे राज्य म्हणजेच “स्वराज्य” स्थापन केले, त्या प्रमाणे आपण सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेली “सत्य” व “अहिंसा” हि मूल्ये वापरत व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत जन चळवळ उभी करण्याची व ती यशस्वी करत शेवटच्या कुटुंबाला घर मिळेपर्यंत प्रामाणिकपणे संविधानिक मार्गाने लढण्याची शपथ उपस्थित नागरिकांनी घेतली.

महाराष्ट्रभर सर्वसामान्यांच्या घरांचे अनेक प्रश्न आहेत. काही भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट बिल्डर्स आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने सर्वसामान्यांचे घराशी संबंधित प्रश्न खूप जटिल बनले आहेत. त्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. येत्या काळात “माझे घर, माझी जमीन अभियान” मार्फत सर्वसामान्यांच्या पुढील प्रश्नांवर प्रामुख्याने काम करण्यात येईल.

१. झोपडपट्टी धारकांच्या घरांचा प्रश्न
२. जुन्या चाळी व जागांचा विकास / पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न
३. सोसाट्यांमध्ये राहणाऱ्या फ्लॅट धारकांचा “कन्व्हेयन्स” व “डीम्ड कॉन्व्हेयन्स”

वरील प्रश्नांवर काम करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील समविचारी कार्यकर्त्यांनी व जनतेने “माझे घर, माझी जमीन अभियान” या जन चळवळीत सहभागी व्हावे.

Views: 143
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
संध्या जगताप प्राथमिक शिक्षिका ते मुख्य कार्यकारी अधिकारी

संध्या जगताप प्राथमिक शिक्षिका ते मुख्य कार्यकारी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)