युवकांनो वेळीच सावध व्हा. राजकारण्यांच्या आषाढयंत्रातून वाचा,नोकरी हा तुमचा हक्क आहे गुलामी नव्हे.
दोन दिवसापूर्वी काढण्यात आलेल्या कंत्राटी भरतीच्या अमेशाला बळी न पडता स्वतःचा हक्क मागण्यासाठी मोर्चा काढा. जुनी पेन्शन ही तुमच्या बांधवांना मिळण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, घरफोडने हे राजकारणांचे जुने षडयंत्र आहे. हे तत्व ते नेहमीच अवलंबत असतात.
कोणत्याही पुढाऱ्याचा मुलगा अथवा मुलगी कोणी नातेवाईक जुनी पेन्शनच्या संपामध्ये नाही किंवा सुशिक्षित बेरोजगार म्हणूनही नाही ते फक्त तुमचा आणि आमचा फक्त वापर करून घेण्यासाठी समोर येतील. कॉन्टॅक्ट बेसिक मध्ये दिलेल्या पदभरती आणि त्यापुढील पगार हे फसवे आहेत .वीस वर्ष नोकरी करून देखील कोणत्याही कर्मचाऱ्याला पन्नास ते साठ हजार वर्षाच्या वर पगार जात नाही ,कॉन्टॅक्ट बेसिक वर काम करणारे शिक्षण सेवक असतील एसटी कामगार असतील किंवा इतर कामगार असतील त्यांना तीन हजार, पाच हजार, सहा हजाराच्या वर पगार देण्यात आला नाही, हे वास्तव सत्य आहे त्यामुळे हा संप मोडीत काढण्याकरिता हे पुढाऱ्यांचे राजकर्त्यांचे षडयंत्र आहे,
यापासून वेळीच सावध व्हा आणि एकच मिशन जुनी पेन्शन मध्ये उतरलेल्या आपल्या बांधवांना सहकार्य करा आम्ही सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळण्याकरिता आपल्या संपात कधीही पाठिंबा देऊ आपल्या सोबत रस्त्यावर उतरू परंतु राजकारणाचा हा हेतू साध्य होऊ देऊ नका, नाहीतर येत्या काळामध्ये असेही पत्र निघतील, आणि जर निघाले तर आपल्याला अतिशयोक्ती वाटायला नको आश्चर्य वाटायला नको, राजकर्त्यांच्या घरी कामगार पदभरती आहे,
1) पाणी भरण्याकरिता- 20000
2) घराची स्वच्छता करण्याकरिता -25000
3) धुणे भांडी करण्याकरिता -20000
4) चपलाबुटे साफ करण्याकरिता 25000
5) गाडी धुण्यासाठी व इतर कामे 30000
आणि मग बेरोजगारी युवकांना गुलामी करावी लागेल.
मित्रांनो आपण गुलाम नाही हक्कदार आहोत आपला हक्क आपण नक्कीच मिळू यात नोकरी हा आपला हक्क आहे परंतु आपणच आपल्या बांधवांना विरोध करणे हे योग्य नाही असे विनम्र आवाहन मी आपल्या सर्व सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या बांधवांना करत आहे. शासनाने कित्येक वर्षापासून नौकर भरती केलेली नाही ती नोकर भरती करण्यास आपण त्यांना भाग पाडू ,परंतु आज जो आपल्या कुटुंबासाठी आपल्या सर्वांसाठी कर्मचारी वर्ग जुन्या पेन्शन करिता रस्त्यावर उतरला आहे त्यांना आपण विरोध न करता पाठिंबा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आहे एक जुनी पेन्शन करिता आग्रही आपलाच कुटुंब बांधव.🙏