समलिंगी विवाहास मान्यता योग्य की अयोग्य?
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सध्या सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याविषयी पाच सदस्यीय घटनापिठाकडे तब्बल एकवीस याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यानिमित्ताने मला माणूस म्हणून असा प्रश्न पडला आहे की, निसर्गाने या पृथ्वीतलावर फक्त स्री चीच निर्मिती का केली नसावी? किंवा फक्त पुरूषाचीच निर्मिती का केली नसावी? स्री आणि पूरूष या दोघांचीही निर्मिती का केली असावी? पृथ्वीतलावरील कोणताही जीव बघा तो नर आणि मादी असा आहे. त्यामूळे मा. सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल याचिकेत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता हा प्रश्न येतोच कुठे? समलिंगी, विवाह, कायदेशीर मान्यता, मुल दत्तक घेण्याचा आधिकार, समलैंगिकांचे आधिकार हे सगळे स्वतंत्र शब्द आहेत. ते एकत्रीत करून त्यांच्या आधारे समलैंगिकांना विवाह करण्यास कायद्याने मान्यता द्यावी, अशी मागणी करणेच मुळात निसर्गाच्या विरूद्ध आहे. त्याचबरोबर निसर्गाने निर्मिलेल्या सृष्टीच्याही सर्वांगीण संवर्धनाच्या विरूद्ध आहे. तसेच मानवीमूल्यांच्या संवर्धनासाठी निर्मिलेल्या स्री आणि पुरूष रचनेच्याही विरूद्ध आहे. अमेरिकेने विवाह कायद्यात बदल केलेत, मग आपणही करायला हवेत. जगातील काही राष्ट्रांनी समलिंगी विवाहाला परवानगी देणारे कायदे बनविले आहेत, मग आपणही बनवावेत ई. या दडपणाखाली देशाने आणि सर्वोच्च न्यायालयाने येता कामा नये. आपण निसर्ग नियमानुसारच वागले पाहीजे, असेच मला वाटतेय. मा. सर्वोच्च न्यायालयालाही आता अशा प्रकारची मागणी, बळजबरी, मानवी आग्रह याला कितपत स्थान द्यायचे, हे ठरवावे लागणार आहे. तसेच जगातील राष्ट्रांनी या विषयाच्या अनुषंगाने केलेले कायदे, त्याचे झालेले फायदे आणि तोटे या चक्रव्यूहात न आडकता, केवळ मुठभरांच्या विकृत अनैसर्गिक आनंदासाठी सृष्टीचा आणि तमाम भारतीय नागरिकांच्या नैतिक मूल्यांचा तसेच त्यांच्या नैसर्गिक भावनांशी खेळता कामा नये. असाही विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या मूठभरांच्या समलिंगी विवाहाला मान्यतेचे दडपण न येऊ देता, निसर्गनिर्मित रचनेचे समर्थन केले पाहिजे. इथे आपण या विषयाच्या अनुषंगाने फक्त जगाचा किंवा आपल्या देशाचा विचार न करता समग्र सृष्टीचा, मानवाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे, म्हणून समलिंगी विवाह आवश्यक आहे काय? तो कशासाठी आवश्यक आहे? ही मागणी देशातील किती लोकांनी केलेली आहे? त्यांची यादी सर्वोच्च न्यायालयात आज रोजी उपलब्ध आहे काय? मग ही मागणी कोणी केली? का केलेली आहे असा विवाह कशासाठी करायचा? असा आग्रह कशासाठी धरायचा?
यामागे त्यांचा हेतू काय आहे? निसर्गाला बदनाम करण्याचा? निसर्गाला हानी पोहोचविण्याचा, मानवी प्रतिष्ठेला काळीमा फासण्याचा? मानवी कौटुंबिक आणि सामाजिक नैतिकतेचा ढाचा उद्ध्वस्त करण्याचा? मानवी मूल्यांना भ्रष्ट करण्याचा? मानवांच्या नैसर्गिक सभ्यतेला बदनाम करण्याचा? देशाला कलंकित करण्याचा? निसर्गाच्या विरूद्ध वागण्याचा? म्हणून अशा प्रसंगी निसर्ग प्रेमी, संस्था, व्यक्ती, संघटनांनी सुद्धा एकत्र येऊन नैसर्गिक नियमांचे उल्लंघन होतेय म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली पाहीजे. हे ते कोण लोक आहेत? ते अशी विकृत मागणी का करीत आहेत? यांची आधी नैसर्गिक, वैद्यकीय, वैज्ञानिक चाचणी झाली पाहीजे. यांच्या हेतूची आणि उद्देशाची वैज्ञानिक चाचणी झाली पाहिजे. आणि ते या विषयावरच आडून का बसले आहेत? त्यांचे अंत्यस्थ हेतू आणि उद्देश कोणाच्या कमी हिताचे आणि कोणासाठी जास्त हानीकारक आहेत? या मागणीत कोणते कौटुंबिक सुख सामावले आहे? यात कोणते सामाजिक सुख आणि हित सामावले आहे? यात कोणते नैसर्गिक हित सामावले आहे? यात कोणते देशहित सामावले आहे? दोन समलैंगिकांच्या विकृत सुखासाठी, कृतीसाठी आपण कुटूंब, समाज, आरोग्य, प्रतिष्ठा, नितीमूल्य, आदर, मान, सन्मान, नैतिक दृष्टिकोन, देश, निसर्ग ई. मूल्यांचा बळी देणार आहोत काय? हि मागणी अनैसर्गिक आहे. समलिंगी ही अनैसर्गिक जोडी आहे. तिला निसर्गाने विवाहाची मान्यता दिलेली नाही. मग कायद्याच्या नावाखालीही अशी मान्यता नसली पाहीजे. म्हणून तिला कायद्याने निसर्गाच्या विरोधात कौटुंबिक आणि सामाजिक स्थान मिळता कामा नये.
मला असे वाटतेय की, मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्या, या मागणी आडून मानवी मनात उफाळून आलेले विकृत आणि वाईट विचार आणि भावनांना अनैसर्गिक कृती करण्यासाठी शरीर उपलब्ध करून देण्याचा विकृत भाव दिसून येतोय. पृथ्वीतलावर स्री आणि पुरूषाची नैसर्गिक आणि कायदेशीर बसलेली घडी विस्कळीत आणि कलंकित करण्याचा हा प्रयत्न आहे.
“Another unhuman world is possible” ची निर्मिती करण्याचा हा डाव आहे.
Which will not never allow by the nature nor Act. जो मानवी सभ्यता आणि प्रतिष्ठे विरोधी आहे.
अनेक देशात आजही समलैंगिकांच्या विवाहावर बंदी आणणारे कायदे आहेत. त्यामुळे भारत देशाने काही मूठभर माथेफिरूंच्या या मागणीला थारा देता कामा नये.
समलिंगीनी आमच्या विवाहाला मान्यता द्या, असे म्हणणे म्हणजे अमान्यतेला मान्यता द्या, असे म्हणणे आहे. चूक करण्याला बरोबर आहे, अशी मान्यता द्या, असे म्हणणे आहे.
अनैसर्गिक कृत्याला कायद्याने समर्थन द्या, असे म्हणणे आहे. अमानवीय कृतीला कायद्याचे पाठबळ द्या, असे म्हणणे. उद्या विविध गुन्ह्यातील गुन्हेगार सुद्धा अशी मागणी करू शकतील की, आम्ही मानवासोबत केलेल्या गून्ह्यांपासून आम्हाला कायदेशीर संरक्षण द्या. समलिंगी विवाहाची मागणी ही मानवीय दृष्टीने अन्यायी आणि अत्याचारी आहे. तो एक गुन्हा आहे.
म्हणून असे मानसिक विकृत लोक सुद्धा निसर्गाच्या नजरेत गुन्हेगारच आहेत. यांच्यामुळे कुटूंब आणि समाजाकडे बघण्याच्या प्रतिष्ठेला, दृष्टीकोनाला, मानवतेला हानी पोहचेल. समलिंगी इच्छा असणाऱ्या या मूठभर विकृत लोकांना विवाहाची कायदेशीर परवानगी देण्यात येऊ नये. कारण असे विवाह हे निसर्गनियमा विरूद्ध ठरतील. असे विवाह हे नैतिक कौटुंबिक चारित्र्याविरूद्ध ठरतील. असे विवाह हे स्री-पूरूष सभ्यतेविरूद्ध ठरतील.
एक हजार पुरूषामागे स्रियांची संख्या नऊशेच आहे, किंवा देशात दर दोन दिवसानंतर अनैतिकतेतून जन्माला आलेले एक अर्भक रस्त्यावर फेकून देण्यात येत आहे, असा असमतोल दाखवून या विषयाची पाठराखणही होता कामा नये. निसर्गाच्या नियमांविरुद्ध मनमानी वागण्यामुळे संपूर्ण जग आज प्रचंड चिंतेत असताना, ग्लोबल वॉर्मिंगचा मुकाबला कसा करायचा? हा प्रश्न जगाला भेडसावत असताना पून्हा निसर्गाविरूद्ध वागणे, उरफाटे वागणे देशाला आणि जगाला शोभा देणारे नाही.
मानवाने निसर्गाच्या आड येता कामा नये. मानवाने निसर्गाला बाजूला सारता कामा नये. मानवाने निसर्गाचा र्हास करता कामा नये. निसर्गाची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहीजे, यातच मानवहित दडलेले आहे. मानवाने निसर्गासोबत सुसंगत अशीच वर्तणूक ठेवली पाहीजे. निसर्गाला पूरक असेच वागले पाहीजे. म्हणून मा. सर्वोच्च न्यायालय सुद्धा या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून सदर प्रकरणात देशाला न्याय देईल, अशी अपेक्षा ठेऊ या.
नसता मग “सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नव्हे”, असेच म्हणावे लागेल.
ॲड. सुभाष सावंगीकर, छत्रपती संभाजीनगर यांनी आपले मनोगत वाचकांसाठी व्यकत केले आहे याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.







