दिघंचीत अनोळखी मृतदेह
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता. आटपाडी येथे पुरुष जातीचे मृतदेह बाजार समिती पटांगण दिघंची येथील मोकळ्या जागेतील चिंचेच्या झाडाखाली सरकारी दवाखान्यासमोर आढळून आले.
याबाबत राहुल नारायण वाघमारे रा. दिघंची यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला व फिर्याद दिली आहे.
पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 55 रंगाने सावळा, उंची पाच फूट एक इंच ,अंगाने सडपातळ, चेहरा उभट, अंगात लाल रंगाचा फुल बाईचा शर्ट, खाकी रंगाचा हाफ शटर काळया रंगाची पॅन्ट, छातीवर डाव्या बाजूस तीळ असलेला अनोळखी मृतदेह आढळून आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेजाळ करीत आहेत.

