मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार बीड चे शेख रिझवान, यांच्या ग्राऊंड रिपोर्टींगचा सन्मान
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण
बीड
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने २०२१ या साली जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्तवाहिनी पुरस्कार व हिंदी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केले होते. दिव्य आधारचे संपादक शेख रिजवान यांच्या ग्राऊंड रिपोटींगचा हा सन्मान होणार आहे. येत्या ९ मे रोजी मंत्रालयात या कामाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. संपादक तथा पत्रकार कुमार केतकर यांना जीवनगौरव पुरस्काराने या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला इतर मान्यवरांचीही उपस्थिती
राहणार आहे.
कुमार केतकर, शेख रिजवान, विलास बडे, विनोद राऊत हे आहेत पुरस्काराचे मानकरी
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने २०२९ या साल पुरस्कार जाहीर केले. यात जीवन गौरव पुरस्कार कुमार केतकर यांना जाहीर तर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता शेख रिजवान, न्यूज १८ लोकमत उत्कृष्ट वृत्तवाहिनी पत्रकार विलास बडे यांना व दैनिक भास्कर विनोद यादव
ग्राऊंड रिपोर्टींगचा सन्मान अभिमानास्पद
बीड जिल्ह्यात मोठया प्रमाणात इनामी जमिनी बोगस खालसा करण्यात आल्या होत्या, इनामी जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला होता. या पोटाळ्यात प्रशासन सामील असल्याने पोटाळा उघडकीस आणणे खुप अवघड होते, एकाप्रकारे इनामी जमीन तस्करांनी मजबुत चक्रव्यूह तयार केलेले होते, हे चक्रव्यूह भेदणे शक्य नव्हते, विशेष म्हणजे राजकीय व प्रशासकीय मिलीभगत असल्याने गुंतागुंतीचा विषय होता. अशा चिकट विषयात हात घालून पत्रकार शेख रिजवान यांनी ग्राउंड रिपोर्टींगच्या माध्यमातून ते चक्रव्यूह भेदले आणि जिल्ह्यातील शेकडो एकर बोगस खालसा झालेली जमीन मुक्त केली. या उल्लेखनीय कामाची दखल घेत मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाने उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शेख रिजवान यांना जाहीर केला होता. येत्या ९ मे रोजी शेख रिझवान,ग्राउंड रिपोर्टींगचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे ही बाब ग्राउंड रिपोर्टींगसाठी अभिमानास्पद आहे.







