पाटावरच्या शेवय्या झाल्या लुप्त ; साच्या नंतर मशिनद्वारे शेवय्या निर्मीती सुरु
त-हाडी ( प्रतिनिधी )
: उन्हाळा लागताच महिला वाळवण पदार्थ करतात पुर्वी गव्हाच्या पिठापासून शेवय्या तयार केल्या जात पूर्वी आजी बाई पाटावर ( लांब फळीवर ) ओळून शेवय्या तयार करत नंतर शाच्याच्या सहाय्याने शेवय्या तयार होत आता पाटावरच्या शेवय्या लुप्त झाल्या असून आता मशिनद्वारे शेवय्या निर्मिती होत आहे .
ग्रामिण भागात पूर्वी महिला एकमेकीच्या सहाय्यातुन सरकत करत कुरडाय्या , पापड , वडे , खारड्या , पळी पापड अदि पदार्थ तयार करत असतात . पुर्वी ७० च्या दशकात यंत्र नसल्याने अनेक कामे अंग मेहनतीने केले जात असत . कुरडाय्या साठी गहु पाण्यात टाकाणे काही दिवस ठेवणे नंतर त्याचा चिक व चौथा बाजुला काढला जात होता . चोथा तिखट तेल मिठ टाकून खात असत आता तो चौथा जनावरे खातात . आंबुस चिकाला शिजवून कुरडाय्या तयार केल्या जात असत .
तर शेवय्या तयार करण्यासाठी फळी पाटावर ओळून – ओळून शेवय्या तयार केल्या जात नंतरच्या २००० च्या काळात हात साचे बाज पलंग यांना बांधून शेवय्या तयार केल्या जात असत आता २०१५ नंतर ग्रामिण भागात शेवय्या मशिन ( शेवय्या गिरणी ) आल्या आता तर या मशिनवर जाऊन महिला शेवय्या तयार करतात त्यामुळे श्रम व वेळ वाचत असल्याने अनेक जणी घरच्या साठी शेवय्या मोठ्या आवडीने करत आहेत . त्या मुळे बदलत्या यंत्र युगात अनेक जुन्या पद्धती लुप्त पावत असून त्यामुळे अनेक कामे यंत्राच्या सहाय्याने सुरू आहे . जात्या वरचे दळण ही त्या काळातील आठवण गिरणी मुळे लुप्त पावली आहे .
धावत्या जगात यंत्र युग पुढे येत आहे ‘ त्यामुळे जुन्या पद्धती फक्त एक आठवण बनुन राहिल्या आहे . त्यातल्या फळी पाटावरच्या शेवय्या ही एक आठवण ठरत आहे .







